एंटरटेनमेंट डेस्क - पहिलवान म्हटलं की पिळदार शरीरयष्टी असलेला गडी आपल्या डोळ्यासमोर येतो. पण \'तुझ्यात जीव रंगला\' ही मालिका सुरू झाल्यापासून पहिलवान म्हटलं की मजबूत शरिराबरोबरच भोळा भाबडा चेहरा असलेला राणा आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. या मालिकेची आणि राणाची प्रेक्षकांवर अशीच काहीशी जादू असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.
साधारणपणे मालिका हिट झाल्या की सगळीकडे चर्चा असते ती या मालिकेतील हिरोईनची. पण तुझ्यात जीव गुंतला मालिकेने हा पायंडा मोडला असे म्हणायला हरकत नाही. पाठकबाईंची तर प्रेक्षकांमध्ये चर्चा असतेच पण राणाने या बाबतील अंजलीला चांगलेच आव्हान दिले आहे. कारण या मालिकेतील राणाच्या कामाची जास्त चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण मालिकेत भोळा भाबडा साधा दिसणारा आपला राणादा प्रत्यक्षात मात्र खूपच स्टायलिश आहे. त्याचे खऱ्या जीवनातील नावही वेगळे आहे. चला तर मग जाणून घेऊयात या ऑनस्क्रीन पहिलवानाबाबत...
पुढील स्लाइड्सवर वाचा, \'तुझ्यात जीव गुंतला\'मधील \'राणा\' विषयी...