आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील आहे FU मधील 'परशा'ची हिरोईन, बिग बीं बरोबर केले आहे स्क्रीन शेयर, नृत्यातही निपूण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफ यू' या आगामी चित्रपटाद्वारे मराठी इंडस्ट्रीला एक नवी जोडी मिळणार आहे. या चित्रपटात मराठीचा सुपरस्टार बनलेल्या आकाश ठोसरबरोबर वैदेही परशुरामी हिची जोडी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे आतापर्यंत समोर आलेले ट्रेलर आणि गाण्यांत त्यांची केमिस्ट्री भन्नाट असल्याचे पाहायला मिळत आहे. वैदेही पेशाने वकील असून तिने नृत्याचे प्रशिक्षणही घेतलेले आहे. 

वैदेहीने यापूर्वी मराठीतील काही चित्रपटांसह बिंग बींबरोबर वझीर या चित्रपटातही भूमिका केली आहे. या चित्रपटात तिची लहानशी भूमिका होती. मात्र मराठीमध्ये 'वेड लावी जीवा' या चित्रपटात आदिनाथ कोठारेबरोबर पदार्पण केल्यानंतर तिने 'वृंदावन' आणि 'कोकणस्थ' असे काही चित्रपटही केले. सध्या 'एफ यू' चित्रपटातील तिची भूमिका आणि तिचा ग्लॅमरस लूक याबाबच सगळीकडेच चर्चा सुरू आहे. आकाश ठोसर म्हणजेच परशा हे 'एफ यू' मुख्य आकर्षण आहे. तरीही प्रमोशनमध्ये वैदेहीला चाहत्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळत असल्याचे चित्र आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, वैदेही परशुरामी हिच्याबद्दलची माहिती...

 
बातम्या आणखी आहेत...