आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : जेव्हा बाळासाहेब दादांना म्हणाले, \'थिएटरवाल्याचा पायजमा फाडून तुझ्या हाती देतो\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके तसेच दादा आणि शिवसेना यांच्‍यात एक खास नाते होते. बाळासाहेबांचे मराठी विषयाचे प्रेम आणि रसिकता यामुळे त्‍यांच्‍यात आणि दादांमध्‍ये विशेष जवळीक होती. एकदा दादा कोंडके यांचा चित्रपट मुंबईमध्‍ये लावण्‍यात यावा यासाठी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना 'मराठा मंदिर' वर राडा करण्‍याचा आदेश सोडला होता. दादा कोंडके यांचा आज जन्‍मदिवस आहे. त्‍यानिमित्‍त बाळासाहेब आणि दादा कोंडके यांच्‍यातील हा किस्सा आपण जाणून घेऊयात. 
 
भारतमातामध्येच लागायचे मराठी चित्रपट 
- त्याकाळी मुंबईमध्‍ये मराठी चित्रपट केवळ परळच्या ‘भारतमाता’ सिनेमात लागत होते. 
- इतर चित्रपटगृहांचे मालक मराठी चित्रपट लावायला नकार देत होते. 
- दादांचा 'सोंगाड्या' आणि 'एकटा जीव..' भारतमातामध्‍येच लागले, पण फार कमाई झाली नाही. 
- त्याचे कारण म्हणजे हे थिएटर लहान, त्यात तिकीट दीड रुपया अन् अडीच रुपये होते.
 
गुंड बोलावून दादांना काढले बाहेर.. 
- 'राम राम गंगाराम' च्या वेळी दादांना दादरचे मराठा मंदिर हवे होते, पण मराठा मंदिरचा पारशी मालक त्यासाठी तयार नव्‍हता. 
- त्याचवेळी 'हाथी मेरे साथी' आणि 'बॉबी' हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते. 
- दादांनी मराठा मंदिरचा मालक फिरदोस तारापोरवाला बरोबर चार महिने आधी 'मॉर्निंग शो'चा करार केला होता. 
- पण करारानंतरही तारापोरवाल्‍याने दादांकडे पाठ फिरवली. 
- दादा कोंडके यांच्‍या चित्रपटाला मराठा मंदिर द्यावे म्‍हणून ग्रामीण भागातूनही मागणी वाढली होती. 
- दादांनी तारापोरवाल्याला थिएटरवर जाऊन हात जोडले, पण तो ऐकून घेत नव्‍हता. 
- तारापोरवाल्याने गुंड बोलावले. दादांना बाहेर काढले. मग दादा थेट बाळासाहेबांकडे गेले.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पुढे नेमके काय घडले... 
(संदर्भ - इसाक मुजावर लिखित 'एका सोंगाड्याची बतावणी')
 
बातम्या आणखी आहेत...