Home »Bollywood »Marathi Cinekatta» Struggle Story Of Marathi Actor And Scriptwriter Ashish Ningurkar

पोस्ट खाते ते चित्रपटसृष्टी... व्हाया ‘स्ट्रगल’

अविनाश द. राऊत | Mar 18, 2017, 05:00 AM IST

मायानगरीत असा माणूस आलाय ज्याने जिद्दीने स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलाय. खेड्यातून पोस्ट खात्याच्या नोकरीनिमित्त मुंबईत गेल्यानंतर न्यूनगंड न बाळगता त्याने पटकथाकार, गीतकार, अभिनेता, संवादलेखक या सगळ्या प्रांतात मनसोक्त मुशाफिरी सुरू केली आहे. स्वत:तील प्रतिभेच्या ‘माये’वर त्यांने ही जिद्दीची ‘नगरी’ गाठलीय. अर्थात संघर्ष सुरू आहे, मात्र काही तरी केले त्याचे समाधानही आहेच..!
चित्रपटसृष्टीचा विचार केला तर ऑडिशन, रोलसाठी भटकंती, रिजेक्शन, डिप्रेशन अशा अनेक नकारात्मक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यातून जो तावून सुलाखून निघतो त्याच्याच आयुष्याचे खऱ्या अर्थाने सोने होते. आशिष निनगुरकर हा त्यातलाच एक. अभिनय, मालिका लेखन, चरित्रलेखन, गीतलेखन, पटकथा लेखन अशा सगळ्याच प्रांतांत तो सध्या मुशाफिरी करतोय, मात्र आजही त्याचा स्ट्रगल सुरूच आहे... अगदी अविरतपणे!
पुढे वाचा, आशिषचा कसा राहिला हा प्रवास..

Next Article

Recommended