आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Struggle: पान टपरीवर करायचा काम, आता झालाय विनोदवीर; बायकोची अंगठीही ठेवली होती गहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः भाऊ कदम, पत्नी आणि तिन्ही मुलींसोबत - Divya Marathi
फाइल फोटोः भाऊ कदम, पत्नी आणि तिन्ही मुलींसोबत
मराठीत अनेक विनोदवीर आहेत. मात्र या सर्वांमध्ये सर्वात जास्त क्रेझ दिसून येते भाऊ अर्थातच भालचंद्र कदम या अभिनेत्याची. भाऊ यांनी आपल्या धमाल कॉमेडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये झळकणा-या साध्या भोळ्या भाऊ कदम यांनी आपल्या विनोदी टायमिंगने महाराष्ट्राला पोटधरुन हसायला भाग पाडले आहे. खरं तर भाऊ यांना खरी ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या 'फू बाई फू' या कार्यक्रमाने. मात्र ही लोकप्रियता, प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेल्या भाऊंचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा झाला जाऊन घेऊया...
मुंबईतील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले बालपण
भालचंद्र कदम उर्फ भाऊ यांचा जन्म मुंबईत एका कोकणी कुटुंबात झाला. त्यांचे वडील बीपीटीत नोकरी होते. तर आई गृहिणी होत्या. बालपणापासूनच त्यांना त्यांच्या घरचे सर्व भाऊ म्हणून हाक मारतात. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत. वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये त्यांचे बालपण गेले. वडील हयात असेपर्यंत घराची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. मात्र वडिलांच्या अकाली निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. बीपीटी क्वॉटर सोडावे लागले. वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले.

पुढे वाचा, उदरनिर्वाहासाठी केले कारकुनीचे काम...
हेही वाचा...
बातम्या आणखी आहेत...