Struggle Story:‘सनम तेरी / Struggle Story:‘सनम तेरी कसम’च्या मराठी हिरोने १० रूपये पगारावर केलं होतं STDबूथमध्ये काम

अनुजा कर्णिक

Feb 02,2016 03:26:00 AM IST
इरॉस इंटरनॅशनलच्या ‘सनम तेरी कसम’ ह्या चित्रपटातून हर्षवर्धन राणे हा मराठी अडनावाचा 'मॅचो मॅन', 'कुल डूड' लाँच होतोय. मराठी हिरोंना फक्त सहाय्यक अभिनेत्याची भूमिका मिळणा-या बॉलीवूडमध्ये एका मराठी तरूणाला एवढा छान डेब्यु मिळावा, हे अगदी स्वप्नवतच आहे.
पण खरं तर मराठी असूनही हर्षवर्धनला मराठी बोलता येत नाही. तो म्हणतो,”माझे वडिल मराठी आणि आई तेलगू. माझा जन्म ग्वाल्हेरला झालेला. लहानाचा मोठा ग्वाल्हेरला झालेलो. त्यामुळे आई-वडिलांच्या मातृभाषेपेक्षा हिंदीच जास्त अवगत झाली. वडिल कधी आजीशी मराठीत बोलताना जेवढं मराठी कानावर पडलं, तेवढंच काय ते मला असलेलं मराठीचं ज्ञान. पण ह्याचा अर्थ तुम्ही मराठीत बोलाल तर मला कळणार नाही, असा तुमचा समज असेल. तर तो चुकीचा आहे. मला सगळं मराठी समजतं. अजून बोलण्याचा क़न्फिडन्स नाही. ट्रॅफिक पोलिसांनी हटकलं, तर मी मराठी टोनमध्येच माझं नाव घेतो.”
गेल्या सहा वर्षात १० तेलगू फिल्म करणा-या हर्षवर्धनला नेहमीच बॉलीवूडची ओढ होती. पण ग्वाल्हेरला राहणा-या मध्यमवर्गीय घरातल्या मुलाला आपलं हे स्वप्न सत्यात उतरवणं एवढं सोप्प नव्हतं. हर्षवर्धन म्हणतो, “ग्वाल्हिरमध्ये लोकं बिझनेस करतात. करीयर करण्यासाठी डॉक्टर, इंजिनीअर व्हायचं असतं. एक्टिंग तर फक्त छंद असू शकतो. असं वाटणा-या ग्वाल्हिरमध्ये मी फक्त 'रामलीला'मध्ये भाग घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करू शकत नव्हतो. त्यामुळे इथून बाहेर पडलो, तरच काही वेगळं करता येईल हे वयाच्या १६ वर्षी समजलं. आणि घरातून पळून गेलो.”
घरातून पळाल्यावर अर्धवट शिक्षण घेतलेल्या हर्षवर्धनला तर भुकेलं जगायचीच वेळ आली होती. तो सांगतो, “मी घरातून पळून दिल्लीला पोहोचलो. एक तर कसली पात्रता नसलेल्या मला कोणती नोकरी करायची हेही माहित नव्हतं. दिल्लीला पोहचल्यावर उदरनिर्वाहासाठी STD बूथमध्ये काम केलं. प्रतिदिवशी दहा रूपये पगारावर काम केलं. नोकरीला लागलो, तेव्हा नुकताच अमेरिकेत 9/11 चा हल्ला झाल्याने STD बूथमध्ये कोणी कोणता नंबर लावला. किती वेळ बोललं ह्याची इत्थ्यंभूत माहिती लिहून ठेवावी लागे. मी ते काम मनं लावून करायचो. ज्या व्यक्तिने मला STDबूथला नोकरी दिली. त्याच व्यक्तिने माझं कामातलं नैपूण्य पाहून मला सायबर कॅफेमध्ये नोकरी ऑफर केली.”
“पूढे इन फिल्म ब्रँडिंगसाठी काम करणा-या दिल्लीतल्या एजन्सीत डिव्हिडी डिलिव्हरीचं काम मिळालं. काही काळाने त्याच कंपनीतून मुंबईमध्ये काम करण्याची ऑफर आली. मुंबईत जाण्याचं आमिष मी नाकारणं शक्यच नव्हतं. कारण मला ह्या नोकरीमूळे एक्टिंग करीयरसाठी धडपड करायला संधी मिळणार होती.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, हर्षवर्धनचा मुंबई -हैदराबाद- मुंबई स्ट्रगल
हर्षवर्धन आपल्या मुंबईतल्या स्ट्रगलविषयी सांगतो, मुंबईत आल्यावर मी ऑडिशन्स देऊ लागलो. एकदा मी सब टिव्ही;च्या लेफ्ट राइट लेफ्ट; ह्या नव्या शोसाठी ऑडिशन दिली. आणि त्यात चक्क सिलेक्ट झालो. त्यावेळी आमच्या सारख्या स्ट्रगलर्सपूढे शाहरूख खानचं उदाहरण होतं. शाहरूख खानही दिल्लीहून मुंबईत आले. आर्मी; ह्या टीव्ही शोने करीयरची सुरूवात केली. आणि आज सुपरस्टार बनलेत. मग आपणही त्याच वाटेवर आहोत, असं वाटलं. आणि शोची ऑफर स्विकारली. मग ह्याच मुर्ख लॉजिक;ने मी शाहरूख खानने ज्या एक्टिंग गुरूकडून अभिनयाचा कोर्स केला, त्याच बेरी जॉनचे मी सूध्दा एक्टिंग क्लास जॉइन केले. २००८ ला ती मालिका केल्यावर मग २००९मध्ये एका साऊथ चित्रपटाची ऑफर आली. चित्रपटात चारपैकी एका हिरोची भुमिका करायची होती. मी फिल्म करायचं ठरवल्यावर मुंबईतल्या मित्रांनी तू एवढ्या छोट्या भूमिकेसाठी मुंबई सोडून हैदराबादला जाण्याचा मुर्खपणा करतोयस, टीव्हीसाठी लोकं वाट्टेल ते करायला तयार होतात. तू आपलं चांगलं करीयर सोडायची चूक करतोयस, असं म्हटलं. पण माझ्यासारख्या ग्वाल्हिअरवरून आलेल्या स्ट्रगलर एक्टरसाठी स्वत:ला सिल्व्हर स्क्रिनवर पाहणंच खूप मोठीं गोष्ट होती. त्यामुळे अर्थातच मुंबई सोडून हैदराबादकडे मोर्चा वळवायचं ठरवलं. साऊथ चित्रपटसृष्टीचा अलिखीत नियम आहे, तिथे बाहेरच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या हिरोइन्स आणि त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीतले हिरो चालतात. बाहेरच्या फिल्मइंडस्ट्रीतले खलनायकही चालतात. पण हिरो अजिबात नाही. अशावेळेस हे समीकरणं उलटं होणं, साऊथ इंडियन नसलेला हिरो तिथे चालणं थोडं मुश्किल होतं. त्यामुळे अर्थातच पून्हा स्ट्रगल काही चुकलं नाही. त्या स्ट्रगलच्या काळात मी सुतारकाम शिकलो. फर्निचरला एन्टिकरूप कसं द्यायचं त्याचा अभ्यास केला. फर्निचरला मी दिलेलं एन्टिक रूप लोकांना आवडू लागलं. आणि लोकं मी बनवलेलं फर्निचर विकत घेऊ लागले. मी हॉटेलच्या भिंतीही एन्टिक बनवण्याचं काम घेतलं. ह्या स्ट्रगलमधून मला कळलं. की तुम्हांला काही मोठं करायचं असेल, तर तुमच्या मेहनतीसोबत संयम हवा. एका वर्षाच्या अशा स्ट्रगलनंतर तिथे २०१२ला अचानक ८ चित्रपटाच्या ऑफर आल्या. सगळ्या मी स्विकारल्या. त्यानंतर मला जॉन अब्राहम निर्मित सतरा को शादी; ही हिंदी फिल्म मिळाली. बरं एवढं झालं तरीही स्ट्रगल संपला नव्हता. सनम तेरी कसम;च्या मेकर्सनी मला निवडलंच नव्हतं. त्यांनी दुस-याच एका अभिनेत्याला हिरो म्हणून निवडलं होतं. त्याचं कॉन्ट्रक्ट झालं होतं. हिरो-हिरोइनचं फोटोशूट दोन दिवसांवर आलं होतं. फोटोशूटचे कपडे डिझाइनरने शिवायला दिले होते. आणि मी फिल्ममेकर्सना समजावत होतो, की मी त्याच्यापेक्षा चांगला हिरो असल्याचं सिध्द करेन. कृपया मला एक संधी द्या. त्यांनी कंटाळून माझी ऑडिशन घेतली. आणि चक्क मी त्यांना आवडलो. पहा, शेवटी मला जे हवं होतं, ते मिळालं. सनम तेरी कसमसारखा ड्रीम डेब्यु. पुढील स्लाइडमध्ये पहा, हर्षवर्धन राणेचे फोटोबॉलीवूडला मिळाला नवा मराठी हिरो कुल डूड हर्षवर्धन राणे

हर्षवर्धन आपल्या मुंबईतल्या स्ट्रगलविषयी सांगतो, मुंबईत आल्यावर मी ऑडिशन्स देऊ लागलो. एकदा मी सब टिव्ही;च्या लेफ्ट राइट लेफ्ट; ह्या नव्या शोसाठी ऑडिशन दिली. आणि त्यात चक्क सिलेक्ट झालो. त्यावेळी आमच्या सारख्या स्ट्रगलर्सपूढे शाहरूख खानचं उदाहरण होतं. शाहरूख खानही दिल्लीहून मुंबईत आले. आर्मी; ह्या टीव्ही शोने करीयरची सुरूवात केली. आणि आज सुपरस्टार बनलेत. मग आपणही त्याच वाटेवर आहोत, असं वाटलं. आणि शोची ऑफर स्विकारली. मग ह्याच मुर्ख लॉजिक;ने मी शाहरूख खानने ज्या एक्टिंग गुरूकडून अभिनयाचा कोर्स केला, त्याच बेरी जॉनचे मी सूध्दा एक्टिंग क्लास जॉइन केले. २००८ ला ती मालिका केल्यावर मग २००९मध्ये एका साऊथ चित्रपटाची ऑफर आली. चित्रपटात चारपैकी एका हिरोची भुमिका करायची होती. मी फिल्म करायचं ठरवल्यावर मुंबईतल्या मित्रांनी तू एवढ्या छोट्या भूमिकेसाठी मुंबई सोडून हैदराबादला जाण्याचा मुर्खपणा करतोयस, टीव्हीसाठी लोकं वाट्टेल ते करायला तयार होतात. तू आपलं चांगलं करीयर सोडायची चूक करतोयस, असं म्हटलं. पण माझ्यासारख्या ग्वाल्हिअरवरून आलेल्या स्ट्रगलर एक्टरसाठी स्वत:ला सिल्व्हर स्क्रिनवर पाहणंच खूप मोठीं गोष्ट होती. त्यामुळे अर्थातच मुंबई सोडून हैदराबादकडे मोर्चा वळवायचं ठरवलं. साऊथ चित्रपटसृष्टीचा अलिखीत नियम आहे, तिथे बाहेरच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या हिरोइन्स आणि त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीतले हिरो चालतात. बाहेरच्या फिल्मइंडस्ट्रीतले खलनायकही चालतात. पण हिरो अजिबात नाही. अशावेळेस हे समीकरणं उलटं होणं, साऊथ इंडियन नसलेला हिरो तिथे चालणं थोडं मुश्किल होतं. त्यामुळे अर्थातच पून्हा स्ट्रगल काही चुकलं नाही. त्या स्ट्रगलच्या काळात मी सुतारकाम शिकलो. फर्निचरला एन्टिकरूप कसं द्यायचं त्याचा अभ्यास केला. फर्निचरला मी दिलेलं एन्टिक रूप लोकांना आवडू लागलं. आणि लोकं मी बनवलेलं फर्निचर विकत घेऊ लागले. मी हॉटेलच्या भिंतीही एन्टिक बनवण्याचं काम घेतलं. ह्या स्ट्रगलमधून मला कळलं. की तुम्हांला काही मोठं करायचं असेल, तर तुमच्या मेहनतीसोबत संयम हवा. एका वर्षाच्या अशा स्ट्रगलनंतर तिथे २०१२ला अचानक ८ चित्रपटाच्या ऑफर आल्या. सगळ्या मी स्विकारल्या. त्यानंतर मला जॉन अब्राहम निर्मित सतरा को शादी; ही हिंदी फिल्म मिळाली. बरं एवढं झालं तरीही स्ट्रगल संपला नव्हता. सनम तेरी कसम;च्या मेकर्सनी मला निवडलंच नव्हतं. त्यांनी दुस-याच एका अभिनेत्याला हिरो म्हणून निवडलं होतं. त्याचं कॉन्ट्रक्ट झालं होतं. हिरो-हिरोइनचं फोटोशूट दोन दिवसांवर आलं होतं. फोटोशूटचे कपडे डिझाइनरने शिवायला दिले होते. आणि मी फिल्ममेकर्सना समजावत होतो, की मी त्याच्यापेक्षा चांगला हिरो असल्याचं सिध्द करेन. कृपया मला एक संधी द्या. त्यांनी कंटाळून माझी ऑडिशन घेतली. आणि चक्क मी त्यांना आवडलो. पहा, शेवटी मला जे हवं होतं, ते मिळालं. सनम तेरी कसमसारखा ड्रीम डेब्यु. पुढील स्लाइडमध्ये पहा, हर्षवर्धन राणेचे फोटो

बॉलीवूडला मिळाला नवा मराठी हिरो कुल डूड हर्षवर्धन राणे
X
COMMENT