आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन-सुप्रिया यांच्या एकुलत्या एक लेकीचे Stunning फोटोज बघून तुम्हीही व्हाल तिचे \'जबरा फॅन\'!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध अभिनेते सचिन आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर या दोघांची जोडी 'क्युट कपल' म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे या दोघांच्या वाढदिवसात केवळ एकाच दिवसाचे अंतर आहे. 16 ऑगस्ट रोजी सुप्रिया यांचा तर 17 ऑगस्ट रोजी सचिन यांचा वाढदिवस असतो. सुप्रिया यांनी वयाची 50 तर सचिन यांनी 60 वर्षे पूर्ण केली आहेत. 1985 साली सचिन-सुप्रिया यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. यांना एकुलती एक मुलगी असून तिचे नाव श्रिया आहे. गेल्यावर्षी श्रिया शाहरुख खानसोबत 'फॅन' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकली होती. पहिल्याच बॉलिवूड सिनेमातून श्रियाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची यशस्वी सुरुवात करणारी श्रिया मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्रीसोबतच श्रिया दिग्दर्शिका म्हणूनही ती नावारुपास येतेय. रंगभूमीवरसुद्धा ती रमते.
 
चार वर्षांपूर्वी श्रियाने सचिन पिळगावकर यांचीच निर्मित असलेल्या ‘एकुलती एक’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील श्रियाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. श्रियाने आपल्या करिअरची सुरुवात 'पेटेंड सिग्नल' (2012) आणि 'ड्रेसवाला' (2013) या शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून केली होती.

जाणून घेऊयात तिच्याविषयीच्या ब-याच काही गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...