आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कंडिशन्स अप्लाय' करण्यासाठी सुबोध भावे आणि दिप्ती देवी पहिल्यांदाच आले एकत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं म्हणतात की, ‘लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात’ पण रुपेरी पडद्यावरच्या रेशीमगाठी जुळून यायला सुद्धा असाच योग जुळून यावा लागतो. एकमेकांना चांगले ओळखणाऱ्या कलाकारांना एकत्र काम करण्याची संधी मिळतेच असं नाही. अनेक वर्षे चांगली मैत्री असलेल्या अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री दिप्ती देवीच्या बाबतीतही असंच घडत होतं. एका नाटकाच्या आणि त्यानंतर एका मालिकेच्या निमित्ताने हे दोघं एकत्र काम करणार होते पण तो योग काही जुळून आला नाही. आता मात्र ‘कंडिशन्स अप्लाय– अटी लागू’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने सुबोध आणि दिप्तीचा एकत्र काम करण्याचा योग जुळून आला आहे. येत्या 7 जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
 
पहिल्यांदाच एकत्र काम करण्याचा कसा आहे दोघांचा अनुभव, वाचा पुढच्या स्लाईडवर..
बातम्या आणखी आहेत...