आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actor Subodh Bhave\'s Interview On Marathi Film Lokmanya Ek Yugpurush

न संपणा-या शोधाची सुरूवात म्हणजे ‘लोकमान्य’ - सुबोध भावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लोकमान्य टिळकांच्या लूकमध्ये अभिनेता सुबोध भावे)

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते आणि आपल्या जहालमतवादी भूमिकेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळा आयाम प्राप्त करून देणारे नेते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘लोकमान्य - एक युगपुरूष’ हा चित्रपट आज म्हणजेच 2 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. यात लोकमान्यांच्या भूमिकेचा शिवधनुष्य पेलणाराअभिनेते सुबोध भावे सांगतोय त्याच्या भूमिकेविषयी..
प्रश्न - लोकमान्यांच्या आयुष्यावर आधारित पहिलाच चित्रपट येतोय आणि त्यात तू खुद्द लोकमान्यांची भूमिका करतोयस या विषयी काय सांगशील ?
सुबोध - लोकमान्य टिळकांसारख्या थोर व्यक्तिमत्वावर एकही चित्रपट बनू नये किंवा चित्रपटाच्या दृष्टीने तो विषय दुर्लक्षित राहिला याबद्दल माझ्या मनात नेहमी खंत होती. काही वर्षांपूर्वी मी त्यांच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक वाचलं आणि मला शाळेतील इतिहासाच्या पुस्तकापलिकडील टिळक जाणून घेता आले. ते पुस्तक वाचून मी टिळकांच्या कार्याने, देशभक्तीच्या विचारांनी पुरता झपाटून गेलो. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू सर्वसामान्यांपर्यंत चित्रपटाच्या रूपाने पोहोचावेत अशी माझी इच्छा होती. आणि तसे प्रस्ताव घेऊन मी अनेक निर्माते-दिग्दर्शकांकडे गेलो. त्यावेळी अशा चित्रपटात आपण भूमिका करावी हा विचारही डोक्यात नव्हता. लोकमान्यांचं चरित्र रूपेरी पडद्यावर यावं ही प्रांजळ भूमिका त्यामागे होती. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असतानाच एके दिवशी अचानक ओम आणि नीनाताईंचा फोन आला आणि त्यांनी लोकमान्य चित्रपटाविषयी सांगितलं आणि यात लोकमान्यांची भूमिका मी करावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. खरं तर लोकमान्यांच्या आयुष्यावर चित्रपट येतोय हीच माझ्यासाठी आनंदाची बाब होती पण त्यांच्या भूमिकेविषयी मी कधीच विचार केला नव्हता. पण मग ओम राऊतशी भेट झाली त्याने चित्रपटाची कथा-पटकथा ऐकवली ती आवडली आणि मी या भूमिकेसाठी होकार दिला. पण त्यांनंतरही जवळपास सहा महिने मी मनाची तयारी करत होतो. मी स्वतः या भूमिकेसाठी तयार नव्हतो याचं कारण म्हणजे टिळकांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व मला पेलवेल की नाही याची भीती होती. हे खूप जबाबदारीचं काम होतं. शिवाय माझा स्वभाव किंवा दिसणं हे तसं मृदु आहे आणि मी आजवर ज्या भूमिका केल्या त्या साधारणपणे याच प्रकारात मोडणा-या होत्या. याउलट टिळकांचा स्वभाव, वागणं, बोलणं, दिसणं सगळंच माझ्या विरूद्ध होतं त्यामुळे मी थोडा साशंक होतो.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा ‘लोकमान्य - एक युगपुरूष’ या चित्रपटाविषयीचे आणखी कोणकोणते अनुभव सुबोध भावेने शेअर केले आहेत...