आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुबोध भावेच्या चिमुकल्याची झाली सिल्व्हर स्क्रिनवर एन्ट्री, \'उबुंटू\'नंतर झळकणार या फिल्ममध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा कान्हासोबत सुबोध भावे - Divya Marathi
मुलगा कान्हासोबत सुबोध भावे
'लोकमान्य-एक युगपुरुष', 'कट्यार काळजात घुसली', 'बालगंधर्व', 'फुगे' यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता सुबोध भावे आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. अभिनेत्यासोबतच  तो एक चांगला दिग्दर्शकदेखील आहे. 'कट्यार काळजात घुसली' या त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे प्रेक्षक, समीक्षक सगळ्यांनीच कौतुक केले आहे. आता सुबोधचा हाच अभिनयाचा वारसा त्याचा थोरला मुलगा कान्हा पुढे नेण्यास सज्ज झाला आहे. पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित 'उबुंटू' या चित्रपटात कान्हा महत्त्वाच्या भूमिकेत झळकला आहे. १५ सप्टेंबर रोजी त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. 
 
'उबुंटू' या चित्रपटात कान्हाने संकेत नावाच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारली आहे. कान्हा या चित्रपटात शाळेत दादागिरी करणाऱ्या, नेहमी मस्तीच्या मुडमध्ये असणाऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे. कान्हा खऱ्या आयुष्यातही खूप मस्तीखोर असून त्याला बडबड करायला खूप आवडते. कान्हाला सुबोध भावेचा मुलगा म्हणून ओळख सांगितलेली आवडत नाही. तो सांगतो, माझे नाव फक्त कान्हा आहे.  

कान्हासोबत झळकणार आहे सुबोध... 
विशेष म्हणजे आता सुबोध कान्हासोबत चित्रपटात दिसणार आहे. तृप्ती भोईर दिग्दर्शित आगामी 'माझा अगडबम' या चित्रपटात सुबोध महत्त्वाच्या भूमिकेत असून कान्हाचीदेखील एक महत्त्वाची भूमिका यात आहे. काही दिवसांपूर्वी सुबोधने ट्विटरवरून कान्हासोबत चित्रपट करत असल्याचे जाहीर केले होते. सुबोधने या चित्रपटातील एका दृश्याचा फोटो देखील ट्विटरवर शेअर केला होता. फोटोसोबत त्याने लिहिले होते, ‘माझा मुलगा कान्हा सोबत चित्रपट करताना मला किती आनंद होतोय ते शब्दात सांगू शकत नाही.’

धाकटा मुलगा मल्हारसुद्धा झळकला आहे मोठ्या पडद्यावर...
सुबोध भावे आणि मंजिरी भावे या दाम्पत्याला कान्हा आणि मल्हार ही दोन मुले आहेत. कान्हापूर्वी त्यांचा धाकटा मुलगा मल्हारचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? याचवर्षी जानेवारी महिन्यात रिलीज झालेल्या सुबोध आणि स्वप्नील जोशी स्टारर 'फुगे' या चित्रपटात एका छोटेखानी भूमिकेत मल्हार दिसला होता. एकंदरीतच सुबोधच्या दोन्ही मुलांमध्ये अभिनयाची आवड रुजली असल्याचं दिसून येतंय. 

पाहुयात, सुबोधची त्याची पत्नी मंजिरी आणि दोन्ही मुलांसोबतची खास छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...