आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुबोधचे 'पुष्पक विमान' लवकरच उडणार, दुसऱ्यांदा चित्रपट दिग्दर्शन करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुबोध भावे असा एक अभिनेता आहे ज्याने अभिनयाबरोबरच चित्रपट दिग्दर्शनाचाही यशस्वी प्रवास केला आहे. आता सुबोध नवीन 'पुष्पक विमाना'सोबत गगनभरारी घेण्यासाठी 
सज्ज झाला आहे. सुबोधने 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शन केले आहे.
 
दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त सुबोध भावेने त्याच्या या अपकमिंग प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. सुबोधने सोशल मीडियावर ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. 
 
'पुष्पक विमान' हा पीरीएड फिल्म असणार, दादासाहेब फाळके यांच्यावर बनविलेला चित्रपट असणार की संत तुकारामांवर याची कथा घेण्यात आली असेल याबद्दल अजून काहीच खुलासा करण्यात आलेला नाही. सुबोध या चित्रपटात असणार की नाही हेसुद्धा अजून स्पष्ट होणे बाकी आहे. 

सुबोधसोबत 'दुनियादारी' चित्रपटाचे संवादलेखक वैभव चिंचलकरही या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 'कट्यार काळजात घुसली' च्या यशानंतर सुबोध भावेचे हे दुसरे दिग्दर्शन 
असणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'पुष्पक विमान' चित्रपटाचे पोस्टर....
बातम्या आणखी आहेत...