आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सैराट\'ची कमाई 85 कोटी, सक्सेस पार्टीत अवतरले मराठी तारांगण, बघा NEW PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'सैराट\'च्या सक्सेस बॅशमध्ये अवतरलेले तारांगण - Divya Marathi
\'सैराट\'च्या सक्सेस बॅशमध्ये अवतरलेले तारांगण
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठीत दमदार कामगिरी करणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमा ‘सैराट’ या सिनेमाने आत्तापर्यंत 85 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करेल, अशी आशा व्यक्त केली जातेय. या निमित्ताने शनिवारी मुंबईत सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सैराटच्या टीमसह मराठीतील तारांगण अवतरले होते.

कोणकोण पोहोचले पार्टीत...
दिग्दर्शक नागराज मंजुळे, रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख, अनुजा मुळे यांच्यासह दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि त्यांची पत्नी मेधा मांजरेकर, सत्या मांजरेकर, सुबोध भावे, उर्मिला कानेटकर, अमृता खानविलकर, अमृता सुभाष, जयवंत वाडकर हे सेलेब्स सक्सेस पार्टीचा भाग बनले. याशिवाय संगीतकार जोडी अजय-अतुलसुद्धा आपल्या कुटुंबासोबत पार्टीत पोहोचले होते. सचिन पिळगावकर, रवी जाधव हे सेलिब्रिटीसुद्धा पार्टीत दिसले.
'सैराट'चे आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल
अवघ्या महाराष्ट्राला ‘झिंगाट’ करुन सोडणारा हा सिनेमा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल टाकणार आहे. लवकरच हा सिनेमा तामिळ, मल्यालम, तेलगू या तीन भाषेत येणार आहे. या सिनेमांचे नागराज मंजुळे हे स्वत: दिग्दर्शन करणार आहेत. सैराट हा सिनेमा 29 एप्रिलला सर्वत्र रिलीज झाला. महाराष्ट्रासह देशभरातून आर्ची-परशा यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी अक्षरश: जीव ओवाळून टाकला.
पहिल्याच आठवड्यात बसला होता पायरसीचा फटका...
सैराटला पहिल्याच आठवड्यात पायरसीचा फटका बसूनही, अनेक चाहत्यांनी थिएटर्समध्ये जाऊनच हा सिनेमा पाहणं पसंत केलं. त्यामुळेच या सिनेमाने ही ऐतिहासिक कमाई केली आहे. 29 एप्रिल रोजी ‘सैराट’राज्यभरातील 400 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचे शो 8500 ते 14,000 पर्यंत वाढले. इतकंच नाही साताऱ्यात मध्यरात्री 12 आणि पहाटे 3 चा शोही सुरु होता. ‘सैराट’चं हे यश सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'सैराट'च्या सक्सेस पार्टीची नवीन छायाचित्रे...