आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Party Of Marathi Film Natsamrat For Earning 40 Crores 45 Days

नटसम्राटने कमावला दिड महिन्यात ४० कोटींचा गल्ला, झाली Success Party

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१ जानेवारी २०१६ ला नटसम्राट सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर गेल्या दिड महिन्यात सिनेमाने सुमारे ४० कोटींचा गल्ला जमवला. गेल्या कित्येक वर्षांत मराठी सिनेमाने केलल्या तिकीटबारीवरच्या कलेक्शनमध्ये सर्वाधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन करून नटसम्राट सर्वौच्च यशोशिखरावर जाऊन पोहोचला. त्यामुळे नटसम्राटची ह्या विकेन्डला झोकात सक्सेस पार्टी झाली.
महेश मांजरेकर, नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, अजित परब, मृण्मयी देशपांडे, नेहा पेंडसे ह्या सिनेमातल्या कलाकारांशिवाय मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, आदिनाथ कोठारे, मानसी नाईक, वंदना गुप्ते, भारती आचरेकर ह्या सेलेब्सनी ह्या पार्टीला उपस्थिती लावली.
पार्टीवेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, “वेलकम सारख्या सिनेमाला यश मिळणं वेगळं असतं. पण नटसम्राट सारखा सिनेमा लोकांना इतका आवडू शकतो, ह्याचं खूप बरं वाटतं. कारण वेलकमसारखे सिनेमे आपण करतो. आणि ते विसरायचा प्रयत्ने करतो. पण नटसम्राटसारखा सिनेमा आपल्या मनात रेंगाळत राहतात. त्यामूळे पैसे किती कमावले ह्यापेक्षा हा सिनेमाला प्रेम मिळालंय, हे महत्वाचं वाटतं.”
नानांनी ह्या कार्यक्रमात मेहश मांजरेकरांना एक विशेष मागणी केली. नटसम्राट सिनेमात नानांनी घातलेला संपूर्ण कपडेपट नानांना सिनेमाची आठवण म्हणून हवाय. अर्थात मांजरेकरांनी सूध्दा ही मागणी लगेच मान्य केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नटसम्राटच्या सक्सेस पार्टीचे फोटो
(फोटो - स्वप्निल चव्हाण)