आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लिओनी अवतरणार मराठी सिनेमात, सुजय डहाके ‘फुंतरू’नंतर साकारतोय अॅडल्ट फिल्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सनी लिओनी आणि सुजय डहाके)
मुंबई :‘शाळा’, ‘आजोबा’ यांसारखे चित्रपट केल्यानंतर दिग्दर्शक सुजय डहाके सध्या ‘फुंतरु’ या आपल्या आगामी सायन्स फिक्शनपटाच्या तयारीला लागला आहे. मात्र या सिनेमानंतर तो ‘व्हल्गर अॅक्टिव्हिटीज‌् इनकॉर्प’ या चित्रपटाची तयारी करत असून प्रौढ विषय असलेल्या या चित्रपटामध्ये चक्क सनी लिओनी काम करणार असल्याची चर्चा आहे. ‘व्हल्गर अॅक्टिव्हिटीज इनकॉर्प’ या सिनेमामध्ये सेक्स वर्ल्डसंदर्भातली कथा सुजय दिग्दर्शित करीत आहे. या चित्रपटात सनी लिओेनीला घेण्यासाठी सुजयने तिचा पती डॅनियल वेबरशी सातत्याने संपर्क साधणे सुरू ठेवले होते.
अलीकडेच डॅनियलने याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यामुळे लवकरच पोर्न स्टार व सध्या बॉलिवूडमध्ये गाजत असलेली सनी लिओनी सुजयच्या सिनेमाच्या निमित्ताने मराठीत दिसणार आहे.
सुजयच्या ‘फुंतरू’ या सिनेमामध्ये केतकी माटेगावकर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. दरवेळी नवीन शैली स्वीकारत वेगळा सिनेमा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुजयला सनीशिवाय आपला ‘व्हल्गर अॅक्टिव्हिटीज..’ हा सिनेमा करण्याची इच्छा नाही. त्यामुळे सनीच्या अंतिम होकारावरच त्याचा हा सिनेमा अवलंबून असणार आहे. सनी स्वत: सध्या बॉलिवूडमधील दोन सिनेमांच्या कामात व्यस्त आहे.