आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिकथेतील अप्सरेप्रमाणे दिसली अभिजीत खांडकेकरची पत्नी सुखदा, शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'माझ्या नवऱ्याची बायको' मधील गॅरी त्याची रिल लाईफ बायको राधिकाला कितीही छळत असला तरी त्याची रिअल लाईफ बायको सुखदाचे कौतुक करताना मात्र थकत नाही. अभिजीतने नुकतेच त्याची बायको म्हणजेच सुखदा खांडकेकरचे काही फोटोज् सोशल मीडिया साईटवर शेअर केले आहेत. त्यात सुखदा फारच सुंदर दिसत आहे. अभिजीतने सुखदासाठी Love U असा प्रेमाचा संदेशही दिला आहे. 

 

सुखदाचे पांढऱ्या वस्त्रातील रुप फारच खुलून आले आहे. एका जाहिरातीनिमित्त सुखदाने हे फोटोशूट केले आहे. यात तिच्या अदांनी ती तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. सुखदाही अभिनेत्री म्हणून नाव कमावत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी चित्रपटात सुखदाने अनुबाईची भूमिका केली होती. त्यासोबतच  शेक्सपिअरचा म्हातारा, धारा की कहानी, हीच तर प्रेमाची गम्मत आहे यांसारख्या नाटकांतही काम केले आहे. 

 

केवळ अभिनेत्री नव्हे तर सुखदा उत्तम कथ्थक नृत्यांगनाही आहे. सुखदा अनेक नृत्याचे कार्यक्रमही करत असते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सुखदाचे विविध अदांतील खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...