आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टर लाँच : \'गुलाबी गाल, ओठांवर लाली.. \'बॉईज\'ना घेऊन \'सनी\' कुठे निघाली,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट - सनी लिओनी मराठी चित्रपटांत काम करणार याची चर्चा अनेक दिवस सुरू होती. त्यानंतर सनी मराठी चित्रपटात काम करणार नसून बॉइज या मराठी चित्रपटात तिचे एक गाणे राहणार असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले असून, या पोस्टरवर सनी लिओनी दिसून येत आहे. सनी लिओनी पोस्टरमध्ये सायकल चालवत असून सायकलवर मागे चित्रपटातील तीन बॉइज बसलेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सनीने स्वतः सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती मराठी चित्रपटात गाणे करत असल्याचे जाहीर केले होते. आता हे गाणे कधी रिलीज होणार की थेट चित्रपटातच गाणे पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर व्हायरल झालेले मराठी लूकमधील PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...