आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीत दिसणार \'लैला\'च्या अदा, अवधूतच्या आयटम साँगमध्ये सनी लिओनी लावणार ठुमके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवधूत गुप्ते कंपोज करत असलेल्या गाण्यावर सनी डान्स करणार आहे. - Divya Marathi
अवधूत गुप्ते कंपोज करत असलेल्या गाण्यावर सनी डान्स करणार आहे.
एंटरटेनमेंट डेस्क - हिंदी चित्रपटसृष्टीला हॉटनेसचा तडका दिल्यानंतर आता अॅक्ट्रेस सनी लिओनी मराठी चित्रपटातही झळकणार आहे. अवधूत गुप्तेच्या एका गाण्यावर सनी आयटम साँग करणार असल्याचे अवधूतने सांगितले. खूप प्रसिद्ध असलेल्या सेलिब्रिटीच्या शोधात निर्माते होते. सनी लिओनीशी वारंवार चर्चा करून तिचा होकार मिळवण्यात चित्रपटाच्या टीमला यश आले आहे. 

सनी ज्या चित्रपटासाठी आयटम साँग करणार आहे, त्याचे नाव अद्याप ठरलेले नसून तरुणांच्या विषयावर आधारित हा चित्रपट असणार आहे. अवधूतने या चित्रपटासाठी संगीत केले असून काही गाणीही लिहिली आहे. सनी लिओनीनेही मराठी सिनेमांत प्रथमच झळकत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे गणेश आचार्य गाणे कोरिओग्राफ करत असल्याने आनंद द्विगुणित झाल्याचेही ती म्हणाली. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

'व्हल्गर अॅक्टीव्हीज..' करणार असल्याची होती चर्चा 
काही दिवसांपूर्वी सनी लिओनीने सुजय डहाकेच्या, व्हल्गर अॅक्टीव्हिटीज..  नावाच्या चित्रपटात काम करण्यास होकार दिला असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यादिशेने पुढे काहीही झाले नाही. सुजय डहाकेने शाळा आणि आजोबा चित्रपटानंतर एक मराठी अॅडल्ट सिनेमा तयार करायचा असून त्यात सनीला घेण्याचा आग्रह केला होता. पण त्याचा तो प्रोजेक्ट पुढे जाऊ शकला नाही. सुजय अजूनही सनीला चित्रपटात घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सनीचे मराठी लूकमधील इतर काही PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...