आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Superhit Marathi Film Natsamrat Will Release Once Again

नव्याने रिलीज होणार नटसम्राट, यावेळी नवीन सीन आणि डायलॉग्ससह झळकणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे, 1 जानेवारीला 'नटसम्राट' हा बहुचर्चित मराठी सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसादही मिळाला. परंतु हा सिनेमा पुन्हा एकदा नव्याने थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, यावेळी सिनेमात काही नवीन सीन्स सामाविष्ट करण्यात येणार आहेत.
याविषयी निर्माते विश्वास जोशी सांगतात, 'हिंदी आणि मराठी सिनेमांच्या पायरसीच्या समस्या वाढत आहेत आणि ही समस्या सोडण्यासाठी काय करावे, हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. त्यामुळे 'नटसम्राट'चे पुन:प्रदर्शन हा त्याचा एका भाग आहे. या पर्यायाने ही समस्या किती सुटेल हे ठाऊक नाही. मात्र ज्यांनी सिनेमा अजून पाहिलेला नाही, ते यानिमित्ताने पुन्हा सिनेमा पाहतील ही अपेक्षा आहे. या सिनेमा प्रेक्षकांना काही नवीन सीन्स पाहायला मिळणार आहेत. या निर्णयानंतर प्रेक्षकांच्या सिनेमाबद्दलची उत्सूकता वाढेल, हे नक्की.'
नवीन सीन्स सामाविष्ट करण्याविषयी विश्वास सांगतात, 'नटसम्राट' सिनेमाचे शूटिंग सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत अभिनेते नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक सीन शूट केला होता. हा सीन 22 जानेवारीला पुन्हा रिलीज केल्या जाणा-या 'नटसम्राट'मध्ये दिसणार आहे. यासह अनेक नवीन सीन्स सिनेमात टाकले जातील.
येत्या 22 जानेवारीला अंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर-कोठारे 'गुरु' सिनेमासुध्दा प्रदर्शित होत आहे.