आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीवरील \'म्हाळसा\'चा दिसणार ग्लॅमरस अंदाज, \'अगंबाई अरेच्चा 2\'मध्ये झळकणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी रसिकांच्या मनात घर केलेल्या 'जय मल्हार' मालिकेतील म्हाळसा अर्थातच सुरभी हांडे आता मोठ्या पडद्यावरही झळकणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित 'अगं बाई अरेच्चा 2' या मराठी सिनेमातून सुरभी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याचबरोबर विविध प्रादेशिक भाषांमधील नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेले अभिनेता धरम गोहिलही या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. 22 मो रोजी हा सिनेमा सर्व थिएटरमध्ये झळकणार आहे.
'संधी मिळाली तरच माणूस मोठा होऊ शकतो. नवीन कलाकारांसोबत काम करणे ही जोखमीचे असली तरी त्यांच्यातील उर्जा नेहमीच प्रेरणा देत राहते.' या केदार शिंदे यांच्या वक्तव्याला साजिशी ही निवड असून मोठ्या सोनाली कुलकर्णीच्या कॉलेज जीवनातील भूमिका सुरभी साकारत आहे. सुरभी मुळची नागपूरची आहे. जळगावला तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आणि पुढील शिक्षण तिने नागपूरला घेतले. या संपूर्ण शैक्षणिक कालावधीत सुरभी विविध नाटकांमध्येही काम करू लागली. मुळातच नाटकांची आणि अभिनयाची आवड असलेल्या सुरभीने अनेक एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्या, स्पर्धांमध्ये भाग घेतला. तेथे तिच्या अभिनयाला वाखणण्यात आले. नागपूरला व्यावसायिक नाटकांमध्येही तिने काम केले.
सुरभी अकरावीत असताना तिने 'स्टँडबाय' या हिंदी सिनेमात काम केले. मोठ्या पडद्याचा तिचा हा पहिला अनुभव होता. पदवीचा अभ्यास करत असताना 'आंबड गोड' मालिकेसाठी तिची निवड झाली. त्यासाठी तिने मुंबईची वाट धरली. त्यादरम्यान 2-3 वर्षांपूर्वी कोठारी ब्रदर्सचे तिने ऑडिशन दिले होते. त्यानंतर 'जय मल्हार' मालिकेतील 'म्हाळसा'च्या भूमिकेसाठी तिला अचानक बोलवण्यात आले. परंतु हा प्रवास नव्यानेच सुरु असताना कोणताही ऑडिशन न घेता केदार शिंदे यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाने आपल्याला सिनेमात घ्यावे याचे सुरभीला कौतुक वाटते.
याविषयी सुरभी म्हणते, 'अगं बाई अरेच्चा 2 हा सिनेमा अगदी वेगळ्या धाटणीतील आहे. यात प्रेम कथा असली तर ती टिपीकल नाही. स्पर्शविना प्रेमातील गोडवा हळूवारपणे पटवून देणारी ही कथा आहे. यात कॉलेजतील शुभांगी आणि तिचे प्रेम मी साकारले आहे. म्हाळसा आणि शुभांगी या दोनही अत्यंत प्रेमळ असल्या तरी दोघींमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे दोनही भूमिका साकारणे यातही खूप फरक आहे. पौराणिक म्हाळसा साकारताना अनेक मर्यादा आहेत, मात्र शुभांगी ही आपल्यासारखीच एक सर्वसाधारण मुलगी आहे. त्यामुळे शुभांगी साकारताना मला मजा आली.'
धरम गोहील हा गेल्या 8-10 वर्षे इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती तसेच उर्दू भाषांमधील नाटकांमध्ये अभिनय करत आहे. बालपणापासूनच 'हिरो' बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन तो शाळेच्या वयातच अभिनय क्षेत्रात उतरला. वयाबरोबर ही आवडही वाढत गेली आणि दरम्यान सत्यदेव दुबे, विजया मेहता, चेतन दातार अशा दिग्गजांच्या अभिनयाविषयीच्या कार्यशाळेत त्याने सहभाग घेतला. यापूर्वी दोन गुजराती सिनेमांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. परंतु मुख्य भूमिकेत मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याची 'अंग बाई अरेच्चा 2'मधून मिळाली.
याविषयी धरम सांगतो, दिग्दर्शक शिंदे यांनी माझ्या एका नाटकाचा प्रयोग बघितला आणि माझी थेट निवड केली. मोठे दिग्दर्शक आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासारख्या मोठ्या अभिनात्रींसोबत काम करताना कोणतेही दडपण जाणवले नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सिनेमात मुख्य भूमिका साकारणा-या सुरभी हांडेची खासगी आयुष्यातील ग्लॅमरस छायाचित्रे...