आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... सुरुचीने केले नॉनस्टॉप 84 तास काम!! \'तुफानी अंजली\' म्हणून झाली फेमस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध व्हायला कोणाला नाही आवडत.. पण प्रसिद्ध होण्याची एक किंमतही असते, टीव्ही मालिकेच्या कलाकारांसाठी ती किमंत त्यांच्या भरपूर मेहनतीतून दिसते. कलाकारांना जरी त्यांच्या कामाचे भरपूर पैसे दिले जात असले तरी त्यांच्या कामाचं स्वरूप बऱ्याच मेहनतीचं असतं, कलाकारांसाठी कामाचे वाढलेले तास हा एक मुख्य त्रास असतो आणि अनेक वेळा अनेक कलाकार भरपूर कामाच्या त्रासामुळे मालिकाही सोडतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एपिसोड असतील तर तेवढा त्रास नसतो पण जर डेलीसोप असेल तर मात्र कलाकारांची अगदी हालत होत असते. अशीच हालत सध्या 'अंजली' मालिकेच्या सुरुची अडारकरची झाली आहे. 

सुरुचीची 'अंजली' ही मालिका सोमवार २२ मे पासून सुरु होत आहे. पण अजूनही अनेक गोष्टींचे शूटिंग वेळेअभावी पूर्ण झाले नाही. सकाळी ९ वाजता लागलेली शिफ्ट साधारणतः रात्री ९ ला म्हणजेच १२ तासांनी संपते. मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे एपिसोडची पूर्ण बँकिंग अजून तयार झालेल नाही. ह्या गोष्टीचे महत्व सुरुचीला नीट समजत असल्यामुळे ह्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी तिनेच स्वीकारली आहे. 
 
प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये आणि मालिकेच्या एपिसोडचे जास्तीत जास्त बँकिंग व्हावे केवळ याकरिता सुरुची तुफान जोमाने कामाला लागली आहे. गेल्या आठवड्यात पूर्ण उत्साहाने तिने चक्क ८४ तास काम केलंय. तिची ही मेहनत बघून दिग्दर्शक चंद्रकांत कणसे आणि तिचे इतर सहकलाकार सुद्धा भारावून गेले आहेत. सुरुची 'अंजली'च्या भूमिकेत इतकी समरस झाली आहे की सेटवर सुद्धा सगळेच तिला तुफानी अंजली या नावानेच हाक मारतात आणि अंजलीसुद्धा अगदी हसून न थकता प्रेक्षकांसाठी काम करायला तयार असते. आता तिची ही मेहनत प्रेक्षकांच्या मनाला किती भिडते हे सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता झी युवावरच समजेल.

डॉ. अंजलीच्या भूमिकेत कशी दिसते सुरुची बघा पुढील स्लाईड्सवर...   
बातम्या आणखी आहेत...