आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suyash, Suruchi, Chinmay Sharing Experience Of First Marathi Rock Concert

माजघरातले मित्र, Selfie, आठवणी, concert मधली धमाल सांगतायत, TV celebs

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिल दोस्ती दुनियादारी’तल्या मित्रांची कॉन्सर्ट होती. आणि त्या कॉन्सर्टला माजघरातल्या मित्रांच्या चाहत्यांसोबतच त्यांचे सेलिब्रिटी मित्रही हजर होते. झी मराठीच्या ‘का रे दुरावा’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘पसंत आहे मुलगी’ ह्या मालिकांचे कलाकार पहिल्या रांगेत बसून ह्या शेवटच्या रॉक क़ॉन्सर्टची धमाल अनुभवत होते. ‘दिल दोस्ती..’च्या सेलेब्स सोबतच सुरूची आदारकर, सुयश टिळक, ललित प्रभाकर, सुनील तावडे, सुहास परांजपे, ऋतुजा बागवे, चिन्मय उदगीरकर, नेहा जोशी अशा सेलेब्सना पाहून त्यांचे चाहते खूप उत्साहित होते. कॉन्सर्ट दरम्यान मग चाहत्यांनी ‘दिल दोस्ती’च्या कलाकारांसह इतर मालिकांमध्ये दिसणा-या कलाकारांसोबतही भरपूर सेल्फी काढले.
ह्या अनुभवाबद्दल Divyamarathi.com शी बोलताना सुयश टिळक म्हणतो, “अशा पध्दतीचा रॉक कॉन्सर्टचा प्रयोग कदाचित मराठीत पहिलाच झाला असावा. ‘का रे दुरावा’ची आमची अख्खी टीम तिथे गेली होती. आमचेच मित्र आणि मैत्रिणी आमच्यासमोर परफॉर्म करताना पाहणं, खूप छान होतं. कोणतं अवॉर्ड फंक्शन नाही, कोणती स्पर्धा नव्हती. निव्वळ मजेसाठी परफॉर्मन्स होता. आम्हीही टेन्शन फ्री होऊन ते एन्जॉय केलं. आमचे मित्र मंचावर नाचत होते. तर आम्हीही प्रेक्षकांमध्ये बसून आमच्या आमच्यात नाचलो. मी थोडासा रोहित राऊतसोबत उत्स्फुर्तपणेही गायलो. ‘जिंदगी जिंदगी’ ह्या गाण्यावर गायलो. कामाच्या व्यापातून आम्हीही जरा मोकळे होऊन मजा केली. एक छोटासा ब्रेक मिळाला. लोकांनी आमच्यासोबत सेल्फी काढले. ऑटोग्राफ घेतले.”
सुरूची आदारकर म्हणते, “ ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये मराठी लोकं भरपूर राहतात. आणि झी मराठी बघणा-यांची संख्या खूप आहे. त्यामुळे आम्ही तिथे गेलो की, प्रेक्षकांशी खूप गप्पा मारता येतात. रॉक कॉन्सर्ट पाहायला मी पहिल्यांदाच गेले होते. ही ‘दिल दोस्ती’ची जी सहा मंडळी आहेत. त्यांची एनर्जी खूप छान आहे. ती अनुभवणंच आमच्यासाठी उत्साहवर्धक होतं. ते सगळे खूप छान गातात. त्यांचा रॉकिंग परफॉर्मन्स पाहणं खूप चांगलं होतं. त्यानिमीत्ताने सगळ्यांना भेटायला मिळालं. खूप नाचलो, गायलो, धमाल केली. खूप चाहत्यांनी सेल्फी काढले. स्वत:च्या मालिकेची प्रसिध्दी अनुभवणं छान होतं. एवढे जास्त प्रेक्षक होते की, अनेकांसोबत सेल्फी काढणं राहून गेलं. आणि खूप यंगस्टर्स कॉन्सर्टला आले होते.”
चिन्मय उदगीरकर सांगतो, “ नेहमी आम्ही मालिकांच्या प्रमोशनला जातो. तेव्हा सगळ्या वयाचा प्रेक्षकवर्ग भेटतो. पण रॉक कॉन्सर्टमूळे टिएनजर्स आणि आमच्या वयाचा प्रेक्षकवर्ग होता. आणि यंगस्टर्सची एनर्जी अनुभवणं. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं कधीही एक वेगळा अनुभव असतो. त्यांचा उत्साह तुम्हांला खूप एनर्जी देतो. त्यात समोर चाललेल्या क़ॉन्सर्टमूळे आम्हांला एक छान चेंज मिळाला. मी तर त्यातल्या गाण्यावर नाचलो सुध्दा. दिल दोस्तीचा टायटल ट्रक मला आवडतो. त्यावर मी प्रेक्षकांमध्ये बसून खूप नाचलो. आम्हांलाही आम्ही एकदम रॉकस्टार्स असल्यासारखं वाटलं. खूप धमाल अनुभव होता.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा काय होतं कॉन्सर्टचं वैशिष्ठ्य सांगतोय सुयश टिळक
(फोटो - स्वप्निल चव्हाण)