आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वानंदी झाली नीलची, महेश-संपदाचंही झाले लग्न, आशिर्वाद द्यायला आले आदेश भाऊजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशपांडेंच्या दोन्ही मुलींची एकाच मांडवात लग्न झालेली आपण लवकरच ‘नांदा सौख्य भरे’ ह्या मालिकेत पाहणार आहोत. एकिकडे जहांगिरदारांचे घर हातचे गेले असतानाच त्यांच्या मुलाच्या लग्नामूळे वडिलोपार्जित इस्टेट मिळण्याचे समाधान लालची ललिताबाईंना आहेच. त्यामूळे त्या हे लग्न निर्विघ्नपणे होऊ देतायत, हे विशेष..
स्वानंदी आणि नील आनंदात आहेत. पण इतके दिवस आपल्या लग्नाची स्वप्न रंगवत असलेली संपदा मात्र नाखूश दिसतेय. तर दुसरीकडे आपल्या दोन्ही मुलींची लग्न होऊन त्या आता परक्या झाल्याने संपूर्ण देशपांडे कुटूंब विरहाच्या दु:खात दिसणार आहे. एकुणच बरंच नाट्य ह्या लग्नाच्या महाएपिसोडमध्ये उलगडताना आपण पाहणार आहोत, हे नक्की आहे.
त्यामूळेच मालिकेच्या ह्या लग्नावेळी जेव्हा divyamarathi.com पोहोचलं, तेव्हा हे सगळे संमिश्र भावनिक अनुभव पाहतानाच, सेटवर आदेश भाऊजींना सपत्नीक पाहून आश्चर्य वाटलं.
भाऊजी ह्या दोन वहिनींना पैठणी घेऊन आलेत कि काय? पण नंतर लक्षात आलं की, ही आदेश भाऊजींची पत्नी सुचित्रा बांदेकरची ही मालिका आहे. त्यामूळे आपल्या निर्माती पत्नीसोबत भाऊजी सेटवर ह्या महत्वाच्या चित्रीकरणाच्या दिवशी आले होते.
मग आता ह्या चित्रीकरणात भाऊजींची किती क्रिएटिव्ह इनपुट्स आहेत, असं विचारल्यावर आदेश बांदेकर म्हणाले, “माझी काडीची ही इनपुट्स नाहीत. मी फक्त ह्या महत्वाच्या टप्याचा साक्षीदार होण्यासाठी आलो होतो इतकंच. मी तर छानपैकी सेटच्या बाहेर मालिकेतल्या कलाकारांशी गप्पाटप्पा करत बसलो होतो. ”
आदेश बांदेकर गप्पांमध्ये व्यस्त असले तरी सुचित्राची मात्रा धावपळ चालू होती. धावपळ करताना सुचित्रा म्हणाली, “मालिका सुरू होताना प्रोमोमधून आणि टायटल साँगमधूनच आम्ही प्रेक्षकांसोबत एक कमिटमेंट केली होती, स्वानंदी जहांगिरदारांच्या घरातली सून होणार हे त्यांना आम्ही दाखवलं होतं. त्यामूळे ती जहांगिरदरांची सून होताना निर्माती म्हणून मी सेटवर असणं गरजेचं होतंच. मालिकेत लग्नात सगळ्या अभिनेत्रींनी नेसलेल्या साड्यांची चॉइस माझी आहे. मी स्वत: जातीने त्याच्या ब्लॉउजच्या पॅटर्न पासून साड्यांच्या स्टाइलिंगकडे बारकाईने लक्ष दिलंय. ललिताची साडी असो, की स्वानंदीचा स्टाइलिश ब्लाउज त्यात माझे इनपुट्स आहेत.”
सेटवर सगळीकडे जोडीने फिरत असलेले स्वानंदी आणि नील खूप खूशीत होते. दोघांनीही लग्नानंतर जोडीनेच दिव्य मराठीला इंटरव्हयू दिला. नील आणि स्वानंदी म्हणाले, “कंकण बांधणं, मंगलाष्टक, सात फेरे, मंगळसूत्र घालणं, सप्तपदी असे सगळे लग्नाचे विधी आम्ही दोघांनीही एन्जॉय केलेत. सध्या आम्ही दोघांनीही आमचं लग्न खूप एन्जॉय केलंय. आणि ह्यापूढेही आयुष्यातल्या सुख-दु:खांना एकत्र सामोरे जायला आम्ही तयार झालोयत. ह्या लग्नात खूप घडामोडी घडणार आहेत. पण आम्हा दोघांचंही बाकी कशाकडेच लक्ष नाहीये. आमची स्वप्न सत्यात उतरण्याचा हा दिवस आहे.”
(फोटो- स्वप्निल चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, का रूसल्यात स्वानंदीच्या सासूबाई ललिता जहांगिरदार