आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्निल आणि अमृता करत नाहीयेत \'वेलकम जिंदगी\'चं प्रमोशन, वाचा त्यामागील कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमृता खानविलकर आणि स्वप्निल जोशी)
स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर स्टारर ‘वेलकम जिंदगी’ ही फिल्म या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होतेय. खरं तर, कोणतीही फिल्म रिलीज होण्याच्या अगोदर त्याचं धडाकेबाज मार्केटिंग आणि प्रमोशन करण्याच्या आजच्या जमान्यात या दोन मराठीतल्या आघाडीच्या स्टार्सची फिल्म आहे, म्हटल्यावर जागोजागी पोस्टर्स आणि प्रत्येक शहरात कलाकारांचं प्रमोशनसाठी फिरणं अपेक्षित होतं. मात्र तसं सध्या काही दिसतं नाही आहे. अमृता आणि स्वप्नील चित्रपटाचं प्रमोशन करताना फारसे दिसलेच नाहीत, म्हटल्यावर भुवया उंचावणं सहाजिकच आहे.
पण चित्रपटाच्या टिमला याबद्दल विचारणा केली असता कळतंय की, “अमृता 'नच बलिये'मध्ये अगोदर व्यस्त होती. बाहेर पडल्यावर ती ‘नच बलिये’च्यावेळी झालेल्या एक्झरशनमुळे आजारी पडली. तिला अगदी हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्याची वेळ आली. आता तिला डिस्चार्ज मिळालाय. पण अजूनही तिला अशक्तपणा आहेच. त्यामुळे ती सिटी टूर्स नाही करू शकत. फार तर फार, मुंबई-पुण्यातल्या मीडियाला इंटरव्ह्यु देऊ शकते. त्यात मध्यंतरी स्वप्निल जोशीही संजय जाधवच्या ‘तूहिरे’ मध्ये व्यस्त होता.”
स्वप्निल जोशीला याबद्दल विचारल्यावर तो म्हणतो, “वेलकम जिंदगी या चित्रपटाचा विषय नेहमीपेक्षा वेगळा आहे. आत्महत्या या विषयावर हा चित्रपट भाष्य करतो. आत्महत्या हा विषय संवेदनशील आहे. तो मार्केटिंग करण्याचा किंवा त्याची पब्लिसिटी करण्याचा विषय नाही. त्यामुळे सिटीटूर किंवा मीडिया इंटरॅक्शन सुध्दा आम्ही जेवढं कमी करता येईल तेवढं कमीच करतोय. आत्महत्येवरचा सिनेमा असला तरीही तो आत्महत्या करू नका असा सांगणारा सिनेमा आहे. त्यामुळे त्यावर जास्त भाष्य न करणंच चांगलं, असं आम्हांला वाटतं.”
शेतक-यांच्या आत्महत्या हा तर महाराष्ट्रासाठी फारच संवेदनशील विषय आहे. अशावेळी आत्महत्या या विषयावर भाष्य करणारा चित्रपट असल्याने सध्या चित्रपटाविषयी कुतूहल चाळवलं गेलंय. पण या चित्रपटात शेतक-यांच्या आत्महत्यांवर भाष्य न करता, आयुष्यातल्या फारच शुल्लक अपयशांवर आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेणा-या कमकुवत युवापिढीवर भाष्य करण्यात आल्याचं स्वप्निल सांगतो. स्वप्निल यासंदर्भात बोलतो,” शेतक-यांची आत्महत्या हा विषय खूप गंभीर विषय आहे. आम्ही त्यावर भाष्य करत नाही आहोत. आयुष्यातले अगदी छोटे छोटे नकार पचवू न शकणा-यांवर, दु:खांना दोन हात न करताच हार पत्करून मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेणा-या शहरांमध्ये राहणा-या तरूण पिढीवर यातनं आम्ही भाष्य केलंय. प्रियकर सोडून गेला म्हणून २२-२५ वर्षीच आयुष्य संपवणा-या मुलीच्या कथेतून आम्ही याविषयावर भाष्य केलंय. त्यामुळेच सर्रास सगळीकडे इतर चित्रपटांसारखं फिरून या चित्रपटाचं प्रमोशन करण टाळलं आहे. आणि मला खात्री आहे, प्रमोशन झालं नाही, तरीही लोकं या चित्रपटाचे प्रोमो पाहून चित्रपट पाहायला सिनेमागृहांमध्ये नक्की पोहोचतील.”
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, वेलकम जिंदगी या सिनेमाची ऑन लोकेशनची आणि अन्य छायाचित्रे...