आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: स्वप्नील जोशीच्या दुस-या लग्नाची पहिली गोष्ट, कसं जडलं प्रेम, मधुचंद्रात कशी झाली फजिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नील आणि लीना - Divya Marathi
स्वप्नील आणि लीना
टीव्हीवरचा ‘कृष्ण’ म्हटलं की अजुनही सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारा गोंडस मराठी चेहरा म्हणजे स्वप्नील जोशी. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील आज त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 18 ऑक्टोबर 1977 रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे.
स्वप्नीलसाठी यंदाचा वाढदिवस अतिशय खास आहे. त्याचे कारण म्हणजे याचवर्षी स्वप्नील बाबा झाला असून तो त्याचा वाढदिवस त्याची लाडकी लेक मायरासोबत साजरा करतोय.

स्वप्नीलचे लग्न चार वर्षांपूर्वी औरंगाबादच्या लीना आराध्येसोबत झाले. स्वप्नील आणि लीना 16 डिसेंबर 2011 ला लग्नाच्या बेडीत अडकले आणि स्वप्निल जोशी झाला औरंगाबादचा जावई. पण सिल्व्हर स्क्रिनवर लव्हस्टोरीज रंगवणा-या ह्या मराठी सिनेसृष्टीतल्या हिरोचं हे होतं ‘अरेंज मॅरेज’. आज स्वप्नीलच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला स्वप्नीलच्या दुस-या लग्नाची गोष्ट सांगत आहोत. स्वप्नीलचे लीनासोबत हे दुसरे लग्न आहे. अकराव्या वर्गात असताना स्वप्नील आणि त्याची पहिली पत्नी अपर्णाचे सूत जुळले होते. पुढे त्यांनी लग्नही केले. मात्र फार काळ हे नाते टिकले नाही. लग्नाच्या केवळ चार वर्षांत स्वप्नील आणि अपर्णा विभक्त झाले. 2009 मध्ये तो अपर्णापासून कायदेशीररित्या विभक्त झाला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, लीनाच्या प्रेमात कसा पडला स्वप्नील, कशी होती त्यांची लग्नानंतरची पहिली रात्र आणि बरंच काही... स्वतः स्वप्नील आणि लीना यांनी आमच्याशी बोलताना त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...