आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swapnil Joshi And His Wife Leena Celebrated 3rd Wedding Anniversary

3rd Wedding Ann: पाहा पत्नी लीनासोबतचे स्वप्नील जोशीचे रोमँटिक क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः पत्नी लीनासोबत अभिनेता स्वप्नील जोशी)
मराठीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी आज आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहेत. स्वप्नीलचे लग्न मुळची औरंगाबादची असलेल्या लीना आराध्येसोबत झाले. 16 डिसेंबर 2011 रोजी औरंगाबाद येथील ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वप्नील लीनासोबत लग्नगाठीत अडकला.
लीनासोबत स्वप्नीलचे हे दुसरे लग्न आहे. स्वप्नीलच्या पहिल्या पत्नीचे नाव अपर्णा होते. अपर्णासोबत त्याचे लव्ह मॅरेज होते. मात्र काही कारणांमुळे त्यांनी घटस्फोट घेतला. केवळ चार वर्षे त्यांचे पहिले लग्न टिकले. 2009 मध्ये तो आपल्या पहिल्या पत्नीपासून कायदेशीररित्या विभक्त झाला. योगायोग म्हणजे स्वप्नीलच्या पहिल्या बायकोप्रमाणे त्याची दुसरी बायको लीना हीदेखील व्यवसायाने डेंटिस्ट आहे.

आज स्वप्नील-लीनाच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दोघांची खास छायाचित्रे दाखवत आहोत...

(इंटरनेटवरील विविध माध्यमांतून फोटो साभार घेण्यात आले आहेत.)