‘बर्थ-डे बॉय’ स्वप्निल जोशी सध्या लोणावळ्यात संजय लीला भन्साली प्रॉडक्शनच्या फिल्मसाठी चित्रीकरणात व्यस्त आहे. स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित ह्या चित्रपटाच्या सेटवर शनिवारी रात्रीपासूनच स्वप्निलच्या वाढदिवसाची तयारी सुरू झाली होती. रात्री १२ वाजता स्वप्निलचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सेटवर दोन केक आणण्यात आले होते. स्वप्ना वाघमारे-जोशी, अविका गौर, मनिष रायसिंग, अंजना सुखानी, समिधा गुरू ह्यांनी स्वप्निलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर त्याच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढले. वाढदिवसाच्या दिवशी स्वप्निल पूर्ण दिवस चित्रीकरण करणार आहे.
स्वप्निल लोणावळ्यात असला तरीही, त्याच्या वाढदिवसाला त्याची बायको लीना जोशीने त्याच्यासाठी सरप्राइजचा प्लॅन केलाय. पण divyamarathi.comसमोर मात्र ह्या प्लॅनमधलं आणि ह्या गिफ्टमधलं ती काहीही रिव्हील करायला तयार नव्हती.
लीना म्हणते, “लोणावळ्यात ह्याक्षणी स्वप्निल कोणतेही वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनल पाहणार नाही. मात्र त्याच्या हातात त्याचा एन्ड्रॉइड असतो. आणि त्याच्यावर तो नियमीत divyamarathi.com वाचतो. त्यामूळे दिव्य मराठीला जर मी काहीही सांगतलं, तर ते हमखास तो वाचणार ह्याची मला खात्री आहे. आणि त्याचा वाढदिवस १८ तारखेला रात्री बाराला संपायच्या आत कोणत्याही क्षणी त्याला माझं सरप्राइज गिफ्ट मिळू शकतं. ज्याचा थोडासाही क्लू त्याच्यापर्यंत पोहोचू नये, असं मला वाटतं.”
लीना दरवर्षी स्वप्निलला सरप्राइज देते. आता ते स्वप्निलच्या अंगवळणी पडलंय. त्यामूळे यंदाही लीनाने काहीही प्लॅन बनवला नसल्याचं त्याला सांगितलं असलं तरीही स्वप्निल सरप्राइज होण्याच्या तयारीत आहे. लीनाने लग्नाअगोदरच्या स्वप्निलसोबतच्या पहिल्या वाढदिवसापासून स्वप्निलला वाढदिवसावेळी सरप्राइज करण्याचा रिवाज चालू ठेवलाय. ती सांगते, “ आमचा नुकताच साखरपुडा झाला होता, आणि मग काहीच दिवसांनी त्याचा वाढदिवस आला. त्याने मला आदल्या रात्री ११ वाजेपर्यंत घरी पोहोचवलं. तो त्याच्या घरी परतला. आणि पाठून मी हळूच टॅक्सीने केक घेऊन आले. आणि त्याला सरप्राइज केलं. तेव्हा त्याच्या चेह-यावरचे भाव पाहण्यासारखे होते.”
स्वप्निलची आई सांगते,” लीनाने मला तिच्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं होतं. त्यामूळे मीही घरात अंधार करून आणि आमच्या घराचा दरवाजा हळूच लीनासाठी उघडून ठेवला होता. स्वप्निलला समजतं नव्हतं, मी घरात अंधार करून का बसले होते. पण मी ही त्याला घरातनं बाहेर लागलेले लाइट रात्रीच्यावेळी किती छान दिसतात. ते दाखवण्यात गुंतवलं होतं. आणि मग बरोबर रात्री बारा वाजता आम्ही त्याला सरप्राइज केलं होतं. ”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, स्वप्निलच्या सेटवरच्या वाढदिवसाच्या आठवणी.. आणि स्वप्निलचा आवडता गोड पदार्थ कोणता