आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swapnil Joshi Has Been Signed For Sanjay Leela Bhasali\'s First Marathi Production

रणबीर,सलमान,रणवीरनंतर SLB प्रॉडक्शनचा हिरो स्वप्निल जोशी, दिपीका पदूकोणने दिल्या शुभेच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग ह्या हिरोंना त्यांच्या फिल्मी करीयरमधल्या महत्वाच्या फिल्म्स संजय लीला भन्सालींनी दिल्यात. संजय लीला भन्साली ह्यांच्या चित्रपटाचा हिरो होणं, सहज सोप नाहीये. पण आता हा मान पहिल्यांदा एका मराठी हिरोला मिळणार आहे. स्वप्निल जोशी, संजय लीला भन्साली प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. भन्साली प्रॉडक्शनच्या पहिल्या मराठी चित्रपटात स्वप्निल जोशी मुख्य भूमिकेत आहे.
 
नुकताच रविवारी अनंत चतुदर्शीच्या दिवशी दूपारी तीन वाजून पाच मिनीटांच्या मुहूर्तावर स्वप्निलच्या ह्या आगामी चित्रपटाचा मुंबईत मुहूर्त झाला. आणि विशेष म्हणजे भन्सालींच्या ‘बाजीराव मस्तानी’च्या मुंबईतल्या सेटवरच हा मुहूर्त झाला. स्वप्निल जोशीला त्याच्या नव्या चित्रपटाच्या मुहूर्तावेळी शुभेच्छा द्यायला, भन्सालींची ‘मस्तानी’ म्हणजेच दिपीका पदूकोण उपस्थित होती.
 
ह्या बातमीला दूजोरा देताना स्वप्निल म्हणतो, “भन्सालींच्या चित्रपटाचा हिरो होणं ही तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहेच. पण त्यांनी ह्या चित्रपटाचा मुहूर्त ‘बाजीराव मस्तानी’च्या सेटवर करणं माझ्या दृष्टीने खूप खास  आणि पवित्र आहे. बाजीराव मस्तानी हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि त्याच सेटवर आम्ही रविवारी भन्साली प्रॉडक्शनच्या ह्या नव्या फिल्मचा मुहूर्त केला. त्यावेळी निर्माते संजय भन्साली, सहनिर्माती शबीना खान, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी, चित्रपटाचा छायाचित्रकार प्रसाद भेंडे ह्यांच्यासोबतच स्वत: दिपीकाही उपस्थित होती. मुहूर्ताचा क्लॅप स्वत: भन्सालींनी दिला. माझ्यावर तिथे एक गणेशस्तुतीही चित्रीत करण्यात आली.”
 
ही फिल्म कशी मिळाली ह्यासंदर्भात स्वप्निल सांगतो, “ मला एक दिवस अचानक संजय लीला भन्सालींच्या ऑफिसमधून फोन आला. मी ऑफिसमध्ये पोहोचलो, तर मला शबीना खान भेटली. तिने मला संजय भन्साली आणि मी एक मराठी चित्रपट निर्माण करू इच्छितायत. आणि त्यासाठी आम्ही तुझी निवड केल्याचे तिने सांगितले. मला तिथे गेल्यावर लक्षात आलं की, पहिल्यांदा कथानक येतं, मग दिग्दर्शक आणि मग कलाकारांची निवड होते. पण इथे मात्र निर्मात्यांनी कथा आणि दिग्दर्शक निवडण्याअगोदर हिरोची निवड केलीय. म्हणजे त्यांना माझ्यावर किती विश्वास आहे., हे लक्षात आलं. आणि मनातून खूप आनंदून गेलो होतो.”
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा कोण असेल स्वप्निलची नवी हिरोईन?