आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swapnil Joshi Is Caring, Sachit Patil Is Philosopher And Guide, Says Gauri Nalawade

स्वप्निल Caring Friend तर सचित Philosopher and Guide, म्हणतेय, गौरी नलावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्निल जोशी, सचित पाटील आणि गौरी नलावडे स्टारर ‘फ्रेंड्स’ ह्या मराठी फिल्मचे पोस्टर नुकतेच स्वप्निल जोशीच्या वाढदिवसाच्या दिवशी चित्रपटाच्या टीमने अनविल केले. २२ जानेवारीला रिलीज होणा-या ह्या फिल्मचे दिग्दर्शक रामण्णा माधेश ह्यांची ही पहिली मराठी फिल्म आहे.
चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर स्वप्निलच्याच वाढदिवसाला लोणावळ्याला जाऊन संजय लीला भन्सालीच्या सेटवर अनविल करण्याविषयी चित्रपटाचा नायक सचित पाटीलला विचारल्यावर, तो म्हणतो, “स्वप्निलच्या वाढदिवसाला ह्यापेक्षा जास्त चांगलं गिफ्ट काय असू शकणार? त्याला त्यादिवशी आप्तस्वकियांकडून आणि चाहत्यांकडून अनेक गिफ्ट आली असणार. पण त्याच्या चित्रपटाच्या पोस्टरचा लूक त्याच्या वाढदिवसाला अनविल करण्यासारखं गिफ्ट दूसरं कोणी दिलं नसणार. त्याच्यासाठी हे सरप्राइज होतं. आमचे दिग्दर्शक सुध्दा खास चैन्नईवरून त्याच्या वाढदिवसासाठी आले होते. त्याला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा फोनवरून दिल्यावर दहाव्या मिनीटाला त्याच्या सेटवर होतो. जे त्याच्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. एवढंच नाही तर त्याला जेव्हा पोस्टर दाखवलं, तेव्हा त्याचा आनंदित चेहरा पाहण्यासारखा होता.”
चित्रपटाच्या पोस्टरवर जय-वीरू स्टाइलमध्ये सचित आणि स्वप्निल बाइकवर बसलेत. त्याविषयी बोलताना सचित म्हणतो, “ हो, पोस्टर अनविल केल्यावर अनेकांनी आम्ही मराठीतले नवे जय-वीरू आहोत का?, असा प्रश्न विचारून आम्हांला क़ॉम्पलिमेन्ट दिलीय. मी आणि स्वप्निल चित्रपटात जिगरी दोस्त आहोत. आणि ह्या जिगरी दोस्तींची ही खूप सुंदर कथा आहे.”
स्वप्निलने ‘दुनियादारी’ मधून तर सचितने ‘क्लासमेट्स’मधून मैत्रीविषयीचा चित्रपट अगोदरच केलाय. पण हा चित्रपट त्याहून वेगळा असल्याचे सचित सांगतो, “एक तर मला आणि स्वप्निलला तुम्ही पहिल्यांदाच एकत्र पाहाल. दूसरी गोष्ट, आम्ही दोघांनीही केलेले हे चित्रपट ग्रुपमधल्या मित्रांवरची एकमेकांशी असलेली मैत्री ह्यावर भाष्य करणारे होते. हा मात्र फक्त त्या दोन मित्रांविषयीच आहे.”
पुढील स्लाइडमध्ये, जाणून घ्या, चित्रपटाच्या पोस्टवर का नाही गौरी नलावडे? आणि गौरी काय म्हणतेय, स्वप्निल आणि सचित विषयी?