आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wanted : स्वप्निल जोशी शोधतोय त्याच्यासाठी नवी हिरोइन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्निल जोशीला त्याच्या आगामी चित्रपटासाठी एक नवीन हिरोइन हवीय. त्यासाठी तो येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या इच्छुक अभिनेत्रींना भेटणार आहे. आणि त्यातली X Factor असलेल्या एकीलाच स्वप्निलसोबत काम करायला मिळणार आहे.
स्वप्निल जोशी याबद्दल सांगतो,”हे टॅलेन्ट हंट नाही. हा माझ्या नव्या चित्रपटासाठीच्या हिरोइनचा शोध आहे. त्यामुळे ह्यासाठी फिक्स क्रायटेरिया नाही. ती मला शोभून दिसावी, एवढीच अपेक्षा आहे. चित्रपटात ती भूमिका काय आहे, हे मी सांगू शकत नाही. कारण मग संहिताच रिव्हील होईल. पण मागच्यावेळी जसं 'मितवा'साठी मी हिरोइन शोधत होतो. पून्हा एकदा तशीच एक हिरोइन मी शोधतोय.”
मितवासाठी घेतलेल्या हिरोइन शोधातून स्वप्निलला फिल्म इंडस्ट्रीतच काम करणा-या प्रार्थना बेहेरेचा शोध लागला. त्याविषयी स्वप्निल सांगतो,”आता बघ ना, खरं तर प्रार्थनाने मालिका आणि 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' मध्ये काम केले होते. पण फिल्म इंडस्ट्रीत तिला कोणी नोटिस केलेच नव्हते. हिरोइन हंट मधून ती आम्हांला सापडली. आणि मग आम्हाला तिच्यात एक स्पार्क दिसला. तिला त्यानंतर ग्रुम केले. याअगोदर कधीही दिसली नव्हती, एवढी ती 'मितवा' मध्ये ग्लॅमरस दिसली. आणि आज पहा, ती मराठी फिल्म इंडस्ट्रीतली लीड हिरोइन आहे.”
स्वप्निल पूढे सांगतो,” आमच्या ह्या शोधात रवि जाधव, संजय जाधव, सई ताम्हणकर, फुलवा खामकर असे फिल्म इंडस्ट्रीतले दिग्गज गेल्यावेळी आले होते. आणि त्यामुळे प्रार्थनाला 'मितवा' मिळालाच. पण या हिरोइन हंटमधल्या टॉप 10 मुलींनाही एक प्लॅटफॉर्म मिळाला. पल्लवी पाटीलला क्लासमेट्स मिळाला. रीनाला दोन सिनेमे मिळाले. एका मुलीला एक टीव्ही सिरीयल मिळाली. इतर अभिनेत्रींनाही फिल्म इंडस्ट्रीत काम मिळायला मदत झाली. त्यामुळे ज्यांना चित्रपटसृष्टीत प्रवेश करायचाय, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्वप्निलच्या ग्लॅमरस हिरोइन्स