आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या वाढदिवसाअगोदरच स्वप्निलला मिळाले गोड सरप्राईज, घरी आला चिमुकला पाहुणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - अभिनेता स्वप्निल जोशी नुकताच बाबा बनला आहे. स्वप्निलच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निलची पत्नी लीनाने आज मुलाला जन्म दिल्याची माहिती कळते. स्वप्निल आअगोदर एका मुलीचा पिता आहे आणि आता मुलाच्या जन्माने त्याच्या घरात आनंदाचे वातावरण असणार यात शंकाच नाही. 
 
स्वप्निलचे लीनाशी 16 डिसेंबर 2011 रोजी लग्न झाले होते. म्हणजेच येत्या काही दिवसात स्वप्निल त्याच्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. पण त्याअगोदरच स्वप्निलच्या घरात आनंदी आनंद गडे असे वातावरण आहे. स्वप्निला अगोदर एक मुलगी आहे तिचे नाव समायरा आहे. स्वप्निलच्या बाळाची झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स नक्कीच आतूर झाले आहेत.
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, स्वप्निल जोशी आणि त्याच्या पत्नीचे काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...