आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swapnil Joshi's Best Friend Mukta Barve Praises About His New Film's Romantic Song

आपली onscreen ‘प्रेमिका’ मुक्ताला दाखवलं स्वप्निलने आपल्या नव्या फिल्मचं गाणं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्या महिन्यात रिलीज होणा-या स्वप्निल जोशीच्या ‘फ्रेंड्स’ फिल्मचं नवं गाणं ‘प्रेमिका’ नुकतंच युट्युबवरून लाँच झालंय. ते लाँच झाल्यावर स्वप्निलला ते पहिल्यांदा दाखवावंस वाटलं आपली बेस्ट फ्रेंड ‘खिकी’ला म्हणजेच अभिनेत्री मुक्ता बर्वेला. ह्या फिल्मशी काहीही संबंध नसताना मुक्ताही स्वप्निलच्या आग्रहाखातर आपल्या व्यापातनं वेळ काढून आली होती.
मुक्ताने ‘दिल दोस्ती यारी वारी’ आणि ‘प्रेमिका’ दोन्ही गाणी पाहिली. आणि त्यानंतर divyamarathi.comला प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, “दिल दोस्ती मध्ये साऊथ स्टाइलचा एक टच आहे. सचित-स्वप्निल दोघंही त्यात छान दिसतायत. तर प्रेमिका खूप हळूवार रोमँटिक गाणं आहे. आतापर्यंत मराठीत ज्यापध्दतीने चित्रीकरण होतं किंवा ज्या त-हेची लव्हसाँग बनतात. त्यापेक्षा प्रेमिका गाणं मला वेगळं वाटलं. गुणगुणावंस वाटावं, असं गाणं आहे. ‘दिल दोस्ती’ पेक्षा प्रेमिका गाणं मला खूप आवडलं.”
असं फार कमीवेळा होतं की, एखाद्या चित्रपटात नसतानाही त्या चित्रपटाच्या प्रमोशनल कॅम्पेनमध्ये एखादी अभिनेत्री आत्मियतेने येते. मुक्तालाच का बोलवावंस वाटलं, असं विचारल्यावर स्वप्निल म्हणतो, “मुक्ता माझी जवळची मैत्रिंण आहे. आणि ऑनस्क्रिन प्रेमिका आहे. त्यामुळे तिची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची असते. गाणं पाहिल्यावर तिने मला शुभेच्छा दिल्या. गाणं आवडल्याचं सांगितलं. आणि फोटो काढून लगेच निघून गेली. पण मेसेजवरून अजूनही ती माझ्याशी ह्या गाण्याविषयी बोलतेय. तिने मला बरेच किस पाठवलेत. ती चित्रपटात असो, वा नसो, तिचा अभिप्राय माझ्यासाठी महत्वाचा नेहमीच असेल.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्वप्निलचे फ्रेंड्स चित्रपटातले प्रेमिका गाणे