आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ON LOCATION : अभिनेता स्वप्निल जोशीची पुन्हा ‘दुनियादारी’, अवतरणार स्मॉल स्क्रिनवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(‘दिल, दोस्ती, दनियादारी’ या मालिकेच्या शूटिंग सेटवर क्लिक झालेली स्वप्नील जोशीची खास छायाचित्रे)

‘दुनियादारी’ चित्रपटाचं यश हे अभिनेता स्वप्नील जोशीच्या करिअरमधला एक महत्वाचा टर्निंग पॉइंट होता. त्यानंतर स्वप्नील बॉक्स ऑफिसचा जणू ‘शाहरूख खान’ झाला. आता पुन्हा एकदा स्वप्निलची 'दुनियादारी' आपल्याला अनुभवता येणार आहे. पण मोठ्या पडद्यावर नाही तर, छोट्या पडद्यावर.
टीव्हीवर सध्या ‘दिल, दोस्ती, दनियादारी’ ही मालिका खूप गाजतेय आणि या मालिकेतल्या मीनलला आपलं करिअर अभिनयातच करायचंय. त्यासाठी सध्या ती मिळेल ते छोटे-मोठे रोल स्वीकारतेय. पण आता तिला चक्क एका सिनेमात काम करण्याची संधी मिळालीय. या सिनेमातला हिरो आहे, स्वप्निल जोशी. असा ट्रॅक आता मालिकेत सुरू होतोय. या ट्रॅकमुळे आता आपल्याला सोमवार, मंगळवार आणि बुधवार असा तीन दिवस अभिनेता स्वप्निल जोशी मालिकेत दिसणार आहे.
एवढंच नाही, स्वप्नील आणि मीनलमधला ट्रॅक काय असणार, हे ही फक्त ‘दिव्य मराठी’ला रिव्हील झालंय. स्वप्निलसोबत एक छोटासा रोल मिळालेली मीनल खूप खूश आहे, कारण आजपर्यंत स्वप्नीलची फॅन असलेली मीनल आता त्याच्यासोबत एका सिनेमात छोटासा का होईना पण रोल करताना दिसणार आहे. आपल्या स्वप्नीलच्या प्रेमात आकंठ बुडालेली आणि त्याच्याशी या ना त्या कारणाने बोलू इच्छिणारी मीनल शुटिंगच्या दरम्यान पोहोचते, स्वप्नीलच्या मेकअप रूममध्ये. आणि नेमकं स्वप्नील आणि मीनल आत एकटेच असताना, मेकअपरूमचं दार बाहेरून लॉक होतं. आता त्यामुळे स्वप्नील अस्वस्थ होतो, आणि बाहेर काढण्यासाठी सेटवरच्या लोकांची धावपळ सुरू होते. पण मीनल मात्र स्वप्नीलसोबत आत एकटी राहण्याचा चॅन्स मिळाल्याने एक्साइट झालेली असते. चिडलेला स्वप्नील आणि आणि आपल्या फ्रेंडसच्या सांगण्यावरून स्वप्नीलसोबत सेल्फी काढायला उत्सुक असलेली मीनल असं गंमतीदार दृश्य आपल्याला मालिकेत दिसणार आहे.
थोडक्यात काय तर या नव्या ट्रॅकमुळे ‘एका लग्नाची दूसरी गोष्ट’नंतर म्हणजेच तब्बल तीन वर्षांनी स्वप्नील जोशीचं मालिकाविश्वात पुनरागमन झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्वप्नीलची ऑन लोकेशनवर क्लिक झालेली खास छायाचित्रे...