‘मुंबई पूणे मुंबईच-२’च्या ‘साथ दे तू मला’ ह्या गाण्याचे मुंबईच्या एका कॉलेजमध्ये अनावरण होत होते. आणि कॉलेज तरूण-तरूणी स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेला पाहून वेडे झाले होते. अख्ख कॉलेज स्वप्निल मुक्ताला पाहण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी जमलं होतं. किमान पाच ते सहा हजाराचा क्राउड स्वप्निल-मुक्ताला बोलताना ऐकून त्यांच्या नावाचा गजर करत होता.
अर्थातच स्वप्निलच्या गो-यापान चेह-यावर ह्यामुळे एक वेगळाच तजेला दिसत होता. तो ह्या तरूण फॅन्सना पाहून divyamarathi.comशी बोलू लागला, “एक तर कॉलेजमध्ये येणे, हे मनाला नवचैतन्य आणणारं असतं. कॉलेजमध्ये आल्यावर मी पून्हा वीस वर्षांचा होतो. मला माझे कॉलेजचे दिवस आठवतात. आणि त्यामूळे हा माझ्या चेह-यावर तजेला तुम्हांला दिसतोय.”
तेवढ्यात गायक हृषिकेश रानडे आणि बेला शेंडे ‘साथ दे तू मला’ हे रोमँटिक गाणे गाऊ लागले. आणि कॉलेजचा संपूर्ण क्राऊड स्वप्निल-मुक्ताला त्या गाण्यावर डान्स करायचा आग्रह धरू लागला. स्वप्निल-मुक्तानेही मग उत्स्फुर्त डान्स करायला सुरूवात केली. आणि मग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनींही ताल धरला.
डान्स झाल्यावर मुक्ता म्हणाली, “जेव्हा मुंबई-पूणे-मुंबई आली होती तेव्हा ही सगळी मुलं शाळेत असतील. कदाचित प्रेमाची भावना त्यांना नुकतीच कळू लागली असेल. पाच वर्ष झाली आमची पहिली फिल्म रिलीज होऊन. त्याचा सिक्वल येताना ह्या मुलांचे हे प्रेम पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांचा उत्साह पाहून असा भास व्हावा, जशी आमची पहिली फिल्म गेल्या महिन्यात रिलीज झालीय. त्यांचं प्रेम पाहून लक्षात आलंय, की प्रेक्षकांच्या मनात MPM-2चे आणि आमचे एक खास स्थान आहे.”
मुक्ता आणि स्वप्निल नाचत असताना, त्यांच्यातली केमिस्ट्री दिसत होती. मुक्ता ह्यावर म्हणते, “स्वप्निलसोबत काम केल्यामूळे असेल, किंवा त्याच्याशी असलेल्या मैत्रीमूळे असावे बहूधा, आमच्या दोघांची खूप चांगली केमिस्ट्री झालीय. तो नाचताना आता पूढची स्टेप काय घेईल, हे मला नक्की माहित असते. आणि त्यामूळेच आमची केमिस्ट्री लोकांना आवडते. बेला आणि हृषिकेशने गाणं सुंदर गायलंय, आणि जेव्हा चिअर-अप करायला, तुमचे सहा-सात हजार फॅन्ससमोर असतात, तेव्हा तर डान्स करायला अजूनच उत्साह येतो.“
(फोटो - प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ‘साथ दे तू मला’ हे गाणं... आणि वाचा, स्वप्निलला का आठवणं झाली, ह्या गाण्याच्या चित्रीकरणावेळी MPM च्या चित्रीकरणाची