आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out Actress Swati Deval And Music Director Tushar Deval\'s Dream Home

कसे आहे \'चला हवा येऊ द्या\' फेम तुषारचे नवीन घर, सांगतेय त्याची पत्नी-अभिनेत्री स्वाती देवल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या नवीन घरात पती तुषार आणि मुलगा स्वराध्यसोबत अभिनेत्री स्वाती देवल - Divya Marathi
आपल्या नवीन घरात पती तुषार आणि मुलगा स्वराध्यसोबत अभिनेत्री स्वाती देवल
मुंबईः स्वप्नातील घर घेण्याची इच्छा प्रत्येकाची असते. मग ती सामान्यातील सामान्य व्यक्ती असो वा सेलिब्रिटी, घर हा प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय असतो. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे भाड्याच्या घरात काढली असतील, तर त्याच्यासाठी स्वतःचे हक्काचे घर मग ते अगदी वन रुम किचन असो वा मोठा बंगला हे एखाद्या राजमहालाप्रमाणेच असते. असेच काहीसे घडले आहे अभिनेत्री स्वाती देवल आणि प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवल यांच्याबाबतीत.
कुंकू, कळत नकळत, पारिजात, वादळवाट, विवाहबंधन, फु बाई फु, पुढचं पाऊल यांसह अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारी स्वाती आणि सध्या 'चला हवा येऊ द्या' या गाजत असलेल्या शोमध्ये संगीत संयोजकाची भूमिका पार पडत असेलला तुषार देवल यांनी नुकतेच त्यांचे स्वप्नातील घर घेतले आहे. गेल्याच महिन्यात दोघांनी आपल्या चिमुकल्यासोबत नवीन घरात गृहप्रवेश केला.
मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न त्यांचे सत्यात उतरले आहे. मात्र बोरिवलीत थ्री बीएचके फ्लॅट खरेदी करण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. त्यांच्या या प्रवासाविषयी आणि नवीन घराविषयी सांगतेय स्वाती...

पुढे वाचा,
- असे काय घडले, की स्वाती-तुषारने डोंबिवली सोडून मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला...
- हे घर घेण्यापूर्वी स्वाती-तुषारच्या आयुष्यात घडली होती एक मोठी दुर्घटना...
- बाळ येणार तर ते स्वतःच्याच घरी घेतला होता निर्णय...
- स्वाती-तुषारचे सोळाव्या मजल्यावरील स्वप्नातील घर, काय आहेत घराची वैशिष्ट्ये... यांसह बरेच काही...
सोबतच पाहा, नवीन घरातील गृहप्रवेशाची आणि घराची खास छायाचित्रे....