आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swwapnil Joshi, Sai Tamhankar And Tejaswini Pandit Starer TuHiRe Official Trailer

Trailer Out: पाहा सई-स्वप्नील-तेजस्विनी स्टारर 'तू हि रे'ची पहिली झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्ह स्टोरी'नंतर दिग्दर्शक संजय जाधव यांचा ‘तू हि रे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या सिनेमाचा ऑफिशिअल ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. संजय जाधव यांची लाडकी जोडी स्वप्नील जाधव आणि सई ताम्हणकर या सिनेमात मेन लीडमध्ये असून अभिनेत्री तेजस्विनी पंडीत या सिनेमाद्वारे जाधव कॅम्पमध्ये सहभागी झाली आहे.
सिनेमाचा ट्रेलर रिफ्रेशिंग असून सई गावातील तर तेजस्विनी शहरातील तरुणीच्या भूमिकेत दिसत आहे. चॉकलेट बॉय स्वप्नील तेजस्विनीच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे, मात्र लग्न सईसोबत झाल्याचे ट्रेलरवरुन लक्षात येतंय. संजय जाधव यांचा सिनेमा म्हटला, की डोळ्यासमोर लॅव्हिश सिनेमा उभा राहतो. 'तू हि रे'विषयीसुद्धा असेच म्हणता येईल.

‘तू ही रे’ मध्ये रोमॅंटिक सागा असलेल्या या सिनेमाचे कोरिओग्राफर सुजित हे असून पंकज पडघन आणि अमितराज, शशांक पोवार हे संगीत दिग्दर्शक आहेत, तर प्रसाद भेंडे यांनी छाया चित्रिकरणाची धुरा सांभाळली आहे. अरविंद जगताप यांनी सिनेमाची कथा लिहिली असून गुरु ठाकूर यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत. करण एन्टरटेन्मेंटच्या या सिनेमाबद्द्लची उसुत्कता आपल्याला सप्टेंबरपर्यंत ताणून धरावी लागणार आहे, कारण ‘तू ही रे’ हा सिनेमा येत्या 4 सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, 'तू हि रे' या सिनेमाचा ट्रेलर...