आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics: स्वप्नील जोशीचे दुहेरी सेलिब्रेशन, वाढदिवशी कापला 'फुगे' सिनेमाचा केक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन प्रयोग आणि नवीन संकल्पनांनी बहरलेले अनेक सिनेमे आता मराठीत येताना दिसत आहे. अशा या नावीन्यतेने नटलेल्या सिनेमांची रंगत आणखीन वाढवण्यासाठी चित्रपटांची नावेदेखील हटके ठेवण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. सिनेमांच्या हटके नावांच्या यादीत आगामी 'फुगे' या सिनेमाचा देखील समावेश होत आहे. मितवा फेम दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'फुगे' या सिनेमाची सध्या मोठी चर्चा होत आहे.
धम्माल मस्तीने भरलेल्या या सिनेमाचे सांताक्रुज येथील लाईटबॉक्समध्ये मोठ्या उत्साहात मोशन पोष्टर आणि टायटल साँगचा टीजर लॉंच करण्यात आला. सिनेमातील सर्व स्टारकास्टच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात मराठीचा सुपरहिरो आणि या सिनेमातील प्रमुख कलाकार स्वप्नील जोशीचा वाढदिवसदेखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा 'फुगे' सिनेमाविषयी बरंच काही... सोबतच बघा, टीजर लाँचवेळी क्लिक झालेले स्वप्नीलच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज... आणि शेवटच्या स्लाईडमध्ये बघा सिनेमाचा टीजर बघायला विसरु नका...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...