आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Revealed : वाचा, सिक्वेलमध्ये कशी पुढे सरकणारेय \'टाइमपास 2\'ची स्टोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('टाइमपास 2'चे पोस्टर)
असं म्हणतात की आपला भूतकाळ आपल्याला कधीच विसरता येत नाही तो आपल्या सोबतच असतो. बऱ्याच वेळेला भूतकाळाची चांगली वाईट आठवण वर्तमानकाळात प्रेरणा होऊन आपल्याकडून अनेक गोष्टी करून घेते. दगडूही याला अपवाद नाही. टाइमपासनंतर आता 'टाइमपास 2' मधून दगडू आणि प्राजू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
दगडू आणि प्राजक्ता यांना विभक्त होऊन आता पंधरा वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र पंधरा वर्षानंतरही पहिलं प्रेम, प्राजक्ता दगडूला सतत आठवतेय. आयुष्यात सगळा मिळवले पण जी मनापासून हवी होती ती प्राजक्ता आज आपल्या आयुष्यात नाही हे त्याला सलतंय. म्हणून तो पुन्हा एकदा प्राजक्ताच्या शोधात बाहेर पडायचे ठरवतो. ती कुठे असेल कशी असेल हे मात्र त्याला आजिबात माहित नाही. सोबतीला मित्र, मनात उत्सुकता आणि पाठीशी साईबाबांचा आशीर्वाद हे घेऊन तो निघतो.
दगडूची गाडी आणि नशीब अशी काही वळणे घेते, की प्राजक्ताच्या आधी त्याची गाठ पडते ती साक्षात शाकाल अर्थात माधवराव लेलेंशी. पुन्हा एकदा दगडू विरुध्द शाकाल असा सामना रंगायला लागतो पण दगडू आणि मित्र अशी काही शक्कल लढवतात की भलतंच घडायला लागते. माधवराव लेले चक्क हळूहळू त्याच्या प्रेमात पडायला लागतात, त्यांना तो आपला वाटू लागतो. त्याला कुठे ठेऊ कुठे नाही असे होते आणि बघता बघता दगडू माधवरावांचं मन आणि विश्वास दोन्ही जिंकतो.
आता सगळा काही छान होणार असे वाटत असतानाच एकामागून एक अशा घटना घडतात की सगळ्यांचीच आयुष्य बदलून जातात. असे काय होते की गोष्टी नुसत्याच बदलत नाहीत तर टोकाला जातात? दगडू आणि प्राजक्ता एकमेकांना भेटतात का? त्याचं पुन्हा प्रेम होतं का? की पहिल्यासारख्या फक्त यातना मिळतात? प्रत्येक टप्प्यावर नवीन प्रश्न, नवीन पेच आणि नवीन वळणं घेत हा टाइमपास आपल्याला आणि दगडू प्राजक्ताला कुठे घेऊन जातो? टाइमपास 2 मध्ये हे सगळं पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा 'टाइमपास 2'चा खास ट्रेलर...