आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... करीना-सैफच्या तैमूरला चित्रपटात घेणे निर्मात्यांना नाही परवडणारे, का ते जाणून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आता शूटिंगवर परतली आहे. तिने तिच्या आगामी  'वीरे दी वेडिंग' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. पण एवढ्या बिझी शेड्युलमध्येही करीना तैमूरला सोबत ठेवतेय. अलीकडेच ती चित्रीकरणाच्या निमित्ताने दिल्लीला गेली होती. येथे तैमूरसुद्धा तिच्यासोबत होता. त्यामुळे तैमूरदेखील या चित्रपटात झळकणार की काय, या चर्चांना उधाण आले होते. पण स्वतः करीनाने ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय तैमूरला चित्रपटात घेणे परवडणारे नसल्याचे खुद्द करीना आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले आहे पण तेही गमतीशीर अंदाजात. 

झाले असे, की दिल्लीत पोहोचलेल्या करीनाला पत्रकाराने तैमूरसुद्धा 'वीरे दी वेडिंग'मध्ये झळकणार का? असा प्रश्न केला. या प्रश्नाचे अतिशय गमतीशीर पद्धतीने करीनाने उत्तर दिले. या प्रश्नोत्तराचा व्हिडिओ समोर आला असून यात करीनासोबत 'वीरे दी वेडिंग'ची निर्माती आणि अनिल कपूरची मुलगी रिया कपूरसुद्धा दिसतेय.
 
'वीरे दी वेडिंग' या चित्रपटाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर करीनाचा हा गमतीशीर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना करीना हसत म्हणतेय, 'तैमूर तर नाही पण त्याची आई नक्की या चित्रपटात काम करत आहे, दोघांनाही चित्रपटात घेऊ शकत नाही. कारण रियाला ते परवडणार नाही. त्यामुळे ती दोघांपैकी एकालाच चित्रपटात घेऊ शकते.’ करीना हे उत्तर देत असताना तिच्या मागे असलेली रिया कपूर गंमतीने म्हणते, "तैमूर मला परवडणार नाही."
 
व्हिडिओत करीना पुढे म्हणाली, "मला चित्रपटातील माझा लूक प्रेक्षकांना दाखवायचा आहे. पण निर्मात्यांची यासाठी मला परवानगी देत नाहीये. त्यामुळे मी केवळ आपला चेहरा तुम्हाला दाखवतेय." आई झाल्यानंतरचा करीनाचा हा कमबॅक चित्रपट आहे. शशांक घोष हा चित्रपट दिग्दर्शित करत असून यामध्ये तिच्यासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  
 
सैफ आणि करीनाचा मुलगा तैमूर  प्रसिद्ध स्टार किडपैकी एक  आहे. तो जिथे जाईल तिथे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खळल्या असतात. त्याचा जन्म झाल्यापासूनच त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.   

पाहुयात, गोंडस तैमूरचे करीनासोबतचे निवडक फोटोज आणि दुस-या व्हिडिओवर बघा करीनाचा व्हिडिओ...  
बातम्या आणखी आहेत...