आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pix: पाहा सरस्वतीचा Wardrobe, जाणून घ्या, तिच्या खणाच्या साड्यांचं वैशिष्ठ्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरस्वती मालिकेतल्या सरस्वती घालत असलेल्या खणाच्या साड्यांविषयी सध्या बरीच उत्सुकता आहे. मालिकेत सरस्वतीचं लग्न होऊन आता जवळ जवळ चार महिने उलटून गेलेत. ह्या चार महिन्यात तिच्या खणाच्या बॉर्डरच्या सिंपल पण स्टाइलिश साड्या मालिका पाहणा-या अनेकजणींना आवडल्यात.
सरस्वती मालिकेतल्या ह्या साड्या डिझाइन केल्यात, वैशाली देशमुख ह्यांनी. आपल्या डिझाइनर साड्यांविषयी वैशाली सांगते, “मी नेहमी हिंदी मालिकांमध्ये पाहिलंय, की प्रत्येक मालिकेतल्या नायिकेची, किंवा खलनायिकेची साडी नेसायची काही तरी एक खास पध्दत असते. ही पध्दत तिच्या पर्सनॅलिटीचा एक भाग असते. आणि मग ती फॅशनमध्ये देखील येते. ही स्टाइल मी मराठी मालिकांमध्ये खूप कमी पाहिली होती. त्यामुळेच जेव्हा सरस्वतीसाठी मला साडी डिझाइन करायला सांगितलं, तेव्हा मी सरस्वतीच्या व्यक्तिरेखेनूसार तिला साडी द्यायचे ठरवले.”
वैशाली आपल्या डिझाइनर वेअरचे बारकावे सांगताना म्हणते, “मी जॉर्जेट आणि सॅटिनच्या साडीला खणाची बॉर्डर लावून सरस्वतीला ती साडी नेसायला देते. मला स्वत:ला खण ह्या प्रकाराविषयी खूप आकर्षण आहे. महाराष्ट्रीयन पेहरावात खणाचं एक वेगळं महत्व आहे. मग मी थोडं क्रिएटिव्हली मॉडिफाय करतं. तिच्या लूकमध्ये खणाला एक स्थान दिलं.”
लूक कसा डिझाइन केला ह्याविषयी वैशाली सांगते, “जेव्हा सरस्वतीचं लग्न झालं नव्हतं. तेव्हा ती सलवार कुर्ती घालायची. तर मी तिच्या कुर्तीला खणाची बॉर्डर दिली. तसंच आता जेव्हा लग्नानंतर ती साडी नेसू लागली. तेव्हाही खणाची बॉर्डर तिच्या साड्यांना दिली. त्यामुळे त्या साड्या वेगळ्या उठून दिसतायत. आणि लोकांना पसंतही पडतायत. “
सरस्वती म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडेला ही ह्या साड्यांविषयी तिचे फॅन्स विचारतात. ती म्हणते, “फेसबुक, ट्विटरवरून किंवा कधी प्रत्यक्ष भेटून जेव्हा फॅन्स माझ्या लूकचं कौतूक करतात. तेव्हा आवर्जून साड्यांविषयी विचारतात. ह्या साड्या कुठे मिळतात, असाही कधी प्रश्न येतोच. माझ्या साड्याचं वैशिषठ्य आहे, की, त्या जरी डिझाइनर असल्या, तरीही त्या सिंपल आहेत. ह्या साड्यांची सिप्लिसीटी, हेचं त्यांचं आगळेपण आहे. सरस्वतीच्या व्यक्तिमत्वातलं साधेपण तिच्या साड्यांमध्येही उतरलंय. माझा लूक माझ्या साडीनेच जास्त खुलतों.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सरस्वतीच्या डिझाइनर साड्या
बातम्या आणखी आहेत...