आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमिळ सुपरस्टार विक्रम करतोय मराठी फिल्म, ही ठरेल 2016 मधली much awaited Film?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘रावणा’, ‘सेतु’, ‘आय’ अशा सुपरहिट चित्रपटांमुळे जगभरातल्या प्रेक्षकांची वाहवाही मिळवलेला तमिळ सुपरस्टार विक्रम आता मराठी फिल्म करतोय. ‘लोकमान्य-एक युगपुरूष’चे दिग्दर्शक ओम राऊत ह्यांच्या आगामी चित्रपटात तो दिसणार असल्याची माहिती मिळतेय. सुबोध भावेने काढलेली सुबोध, ओम राऊत आणि विक्रमची सेल्फी ओम आणि सुबोध दोघांच्याही फेसबुक पेजवर दिसतेय. त्यामुळे अर्थातच सध्या फिल्म इंडस्ट्रीत ह्या नव्या फिल्मविषयी उत्सुकता आहे.
Divyamarathi.com ने ही नवी फिल्म आहे का? असं विचारल्यावर सुबोध भावेने सांगितलं, “हे काय आहे, ह्याविषयावर मी तुमच्याशी काहीच बोलू शकत नाही. मात्र काहीतरी खूप छान गोष्ट आहे, एवढंच सध्या सांगू शकतोय. आम्हांला सरत्या वर्षात तुम्हांला २०१६मध्ये द्यायला एक छान आणि गोड बातमी मिळालीय, एवढंच.”
सुबोध जरी फिल्मविषयी काही सांगातयला तयार नसले तरीही विक्रम आणि त्यांच्या भेटीबद्दल त्यांनी divyamarathi.comला सांगितलं, “चैन्नईला आलेल्या पूरानंतर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काही कामानिमित्त विक्रम मुंबईला आला असता, आमची भेट झाली होता. अगदी अर्धा तासाची ही भेट होती. ह्या भेटीत आम्ही एकमेकांच्या चित्रपटांबद्दल बोललो. कट्यार अजून विक्रमने पाहिली नाही. मात्र ती पाहायची इच्छा त्याने व्यक्त केलीय. ‘लोकमान्य-एक युगपुरूष’ त्याने पाहिलीय. आणि त्यामुळेच मला भेटल्यावर तो चमकलाच. ‘लोकमान्य’मधल्या तुला पाहिल्यावर मी तुला ओळखूच शकलो नाही. तू किती वेगळा दिसतोस, माझा विश्वास बसत नाही, असं त्याने कौतुक करताना म्हटलं.”
ह्या नव्या प्रोजेक्टच्या संदर्भात सध्या ओम आणि सुबोध काहीच बोलायला तयार नाहीयेत. मात्र ओम राऊतच्या प्रॉडक्शन टिममधल्या विश्वसनीय सूत्रांनुसार, ओमची ही नवी मराठी फिल्म असल्याचं समजतंय. ह्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, “डिसेबरच्या महिन्यात विक्रमसर इथे आले होते. अंधेरीतच एका हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली होती. मात्र ते हॉटेलमध्ये कमी आणि ओमसरांच्या अंधेरीतल्या ऑफिसमध्येच जास्त होते. विक्रमसर आपल्या कामाच्या बाबतीत किती उत्साही आणि समर्पित आहेत, तेच आम्हांला यातून पाहायला मिळालं. ते चार दिवस-रात्र ओम सरांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या नव्या प्रोजेक्टविषयी चर्चा करत होते. फक्त अंघोळीला ते हॉटेलवर जायचे. ओमसरांच्या नव्या फिल्ममध्ये एका मराठी व्यक्तिच्या भूमिकेत विक्रमसर दिसतील.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ओम राऊतचे फेसबुक पोस्ट