एंटरटेनमेंट डेस्क - मुस्लीम समाजातील पद्धतीच्या होणाऱ्या गैरवापरावर भाष्य करणारा चित्रपट 'हलाल'चे नुकतेच टिझर लाँच करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, समाजसेवक डॉ. बाबा आढाव, लेखक संजय पवार आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांच्यासह कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
चित्रपटाची निर्मिती अमोल कागणे यांनी केली असून दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांचे आहे. लेखक राजन खान यांच्या 'हलाला' कथेवर आधारित असलेला हा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. पटकथा व संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणी रंजनदास, संकलन निलेश गावंड यांचं आहे. गीते सुबोध पवार व सय्यद अख्तर यांनी लिहिली असून संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे. गायक आदर्श शिंदे यांचा स्वरसाज या चित्रपटाला लाभला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, हलालच्या टिझरमधील काही स्क्रीनशॉट अखेरच्या स्लाइडवर चित्रपटाचे टिझर..