आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Teaser : \'बापाला मुलासाठी महाग असं काहीच नसतं..\', \'बापजन्म\'चा टिझर रिलीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'अमर फोटो स्टुडिओ' सारख्या नाटकाच्या माध्यमातून मराठई रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या निपुण धर्माधिकारी याच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे टिझर आऊट झाले आहे. 'बापजन्म' नावाच्या या चित्रपटात सचिन खेडकर यांची मुख्य भूमिका असून दिल दोस्ती दोबारामुळे प्रकाशझोतात आलेला पुष्कराज चिरपुटकरही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. 

15 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार असून याचा टिझरबरोबरच चित्रपटाचे सोशल मीडियावर प्रमोशनही आधीच सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटाचे विविध पोस्टर फेसबूकवर पोस्ट करून त्याच्या माध्यमातून वडिलांविषयीचे खास संदेश निपुणने त्याच्या फेसबूक वॉलवर पोस्ट केले आहेत. चित्रपटाच्या टिझरवरून या चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करण्यात आलेल्या पोस्ट आणि त्याबरोबर असलेले मॅसेजेस...अखेरच्या स्लाइडवर पाहा टिझरचा व्हिडीओ...
बातम्या आणखी आहेत...