आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actress Tejashree Pradhan Look Stunning In Non Glamorous Look

नॉन ग्लॅमरस लूकमध्ये Stunning दिसते तेजश्री, पाहा मेकअप नव्हे विदाऊट मेकअपमधील Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. मालिकेनंतर आता तेजश्री रंगभूमीवर रमताना दिसतेय. 'कार्टी काळजात घुसली' हे प्रशांत दामलेंसोबतचे तिचे नाटक महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही गाजले. आता तेजश्रीने आपला मोर्चा हिंदीकडे वळवला असून लवकरच ती अभिनेता शर्मन जोशीसोबत रंगभूमीवर दिसणारेय. 'मैं और तूम' हे तेजश्रीच्या पहिल्या हिंदी नाटकाचे नाव असून शर्मन जोशी ते दिग्दर्शित करत आहे. सध्या या नाटकाच्या तालमी सुरु असून लवकरच ते रंगभूमीवर येणारेय.

विशेष म्हणजे या नाटकाच्या घोषणेच्या काही दिवसांपूर्वीच तेजश्रीने तिचा नवीन लूकमधला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत तेजश्री नवीन हेअरकटमध्ये दिसतेय. तिला हा हेअरकट शोभून दिसतोय. तिचा हा नवीन लूक या नाटकासाठीच आहे, की काय... हे कळू शकलेले नाही. मात्र या लूकमध्ये तिने आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले हे विशेष. विदाऊट मेकअप आणि नवीन हेअरकटमध्ये ती स्टनिंग दिसतेय.

'खरं तर तेजश्रीला तिच्या चाहत्यांनी पडद्यावर नेहमी मेकअप आणि नटलेल्या रुपातच पाहिले आहे. विदाऊट मेकअपमधील तिची छायाचित्रे क्वचितच तिच्या चाहत्यांच्या बघण्यात आली असावीत. म्हणूनच मेकअपमध्ये नव्हे तर विदाऊट मेकअपमध्ये तेजश्री कशी दिसते, हे दाखवण्यासाठी तिच्या काही नॉन ग्लॅमरस लूकची झलक दाखवणारी छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. नॉन ग्लॅमरस लूकमध्येही तेजश्री अतिशय सुंदर दिसते.
तुम्हीही पाहा, तेजश्रीचा लक्ष वेधून घेणारा ग्लॅमरस नव्हे तर नॉन ग्लॅमरस लूक...