आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Actress Tejashree Pradhan's Birthday Celebration

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेच्या सेटवर झाले तेजश्रीचे B'day सेलिब्रेशन, पाहा Pix

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः डावीकडे - सुहिता थत्तेंसोबत तेजश्री, उजवीकडे - रोहिणी हट्टंगडींसोबत तेजश्री)

मराठी चित्रपटसृष्ट्रीला लाभलेली एक सुंदर आणि गुणी कलाकार म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्रीने 2 जून रोजी आपला 27 वा वाढदिवस साजरा केला. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेच्या सेटवर सहकलाकारांनी जल्लोषात तेजश्रीचा वाढदिवस साजरा केला. झी मराठीच्या फेसबुक पेजवर तेजश्रीच्या बर्थडे सेलिब्रेशनची छायाचित्रे बघायला मिळतात. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि सुहिता थत्ते या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्या होत्या.
मुळची मुंबईची असलेल्या तेजश्रीने शिक्षण पूर्ण करून आपला कल अभिनयाकडे वळवला. 2010 मध्ये 'झेंडा' या पहिल्या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत प्रदार्पण केले. नंतर पुढे चित्र, शर्यत, उदय, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे अशा विविध चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 'लेक लाडकी या घरची' ही तेजश्रीची पहिली मालिका. मात्र 'होणार सून मी ह्या घराची' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. या मालिकेनंतर तिची फॅन फॉलोईंग बरीच वाढली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेच्या सेटवर झालेल्या तेजश्रीच्या बर्थडे सेलिब्रेशनची छायाचित्रे...
फोटो साभारः झी मराठी ऑफिशिअल फेसबुक पेज