आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tejashri Pradhan, Shashank Ketkar Shows Their Romantic Side In Zee Marathi Awards

‘झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये तेजश्री-शशांकचा रोमँटिक अंदाज, तेजश्रीला नाचण्यात ६/१०गुण देतोय शशांक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्ये सध्या प्रचंड उकाडा वाढलेला असताना ठाण्यात मात्र अचानक गुरूवारी गारवा वाटू लागला, जेव्हा झी मराठी अवॉर्ड्समध्ये मंचावर श्री-जान्हवी आले. तेजश्री आणि शशांकचा हा रोमँस पाहून, ‘ऑक्टोबर हिट’च्या महिन्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ आल्यासारखा त्यांच्या चाहत्यांना वाटू लागला. प्रेक्षकांमध्ये बसलेले चाहते, तर ह्या दोघांना पाहून उत्स्फूर्तपणे त्यांना चिअर-अप करू लागले. शशांक आणि तेजश्री डान्स करत होते, ते रोमँटिक गाणं होतं, ‘देहलीज पे मेरे दिल की..’
शशांक-तेजश्रीच्या परफॉर्मन्सवेळी समोर बसलेल्या चाहत्यांचा उत्साह शशांकला स्टेजवर नाचतानाही कळला होता. त्याबद्दल शशांक सांगतो, “ श्री-जान्हवी खूप क्युट-कपल असल्याने लोकांचे आमच्यावर हे प्रेम आहे. मालिकेत असा एकत्र नाचायचा प्रसंग येत नसल्याने, माझे चाहते मला वर्षातून एकदाच नाचताना पाहतात. आणि मग त्यामूळे मला ते असे चिअर-अप करतात. त्यांच्या टाळ्या मला सांगून गेल्या, की मी चांगला डान्स करू शकलोय.”
शशांक आपल्या परफॉर्मन्सबद्दल विचारल्यावर म्हणाला, “झी मराठी अवॉर्ड्समध्ये नाचण्याचे हे आमचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी एक दिवस, दुस-यावर्षी दोन दिवस आणि तिस-यावर्षी तीन दिवस, आम्ही पुरस्कार सोहळ्याअगोदर रिहर्सल्स केल्यात. मालिका सुरू झाली तेव्हा मालिकेला जास्त वेळ द्यावा लागत असल्याने डान्स प्रॅक्टिससाठी वेळ मिळाला नव्हता. पण आता तिस-यावर्षी मालिका चांगलीच सेट झालीय. त्यामूळे आता नृत्यकौशल्य वाढवायला, जरा वेळ मिळाला.”
शशांक स्वत:च्या आणि तेजश्रीच्या डान्सची समीक्षा करताना म्हणतो, “दरवर्षागणिक माझ्या स्वत:त नृत्याच्याबाबत चांगला बदल झालेला मला स्वत:ला जाणवतोय. आता तिस-या वर्षानंतर मी स्वत:ला डान्समध्ये १० पैकी पाच मार्क्स देईन. मात्र तेजश्री माझ्यापेक्षा जास्त चांगला डान्स करते. एकतर मुलगी असल्याने तिच्यात त्या नृत्याच्या अदा खूप नैसर्गिकरित्या आहेतच. त्यामूळे माझ्यापेक्षा जास्त म्हणजेच १० पैकी ६ गुण मी तिला देईन.”
( फोटो - फोटो - प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, तेजश्री-शशांकने केलेल्या रोमँटिक डान्सचे फोटो