आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीनंतर आता तेजश्री प्रधान वळली हिंदीकडे, शर्मन जोशीसोबत दिसणार रोमान्स करताना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मालिका संपल्यानंतर आता रंगभूमीवर रमताना दिसतेय. तिचे सध्या रंगभूमीवर 'कार्टी काळजात घुसली' हे नाटक सुरु आहे. या नाटकात तेजश्री अभिनेते प्रशांत दामलेंसोबत काम करत आहे. अलीकडेच हे नाटक लंडनमध्ये पोहोचले होते. आता या नाटकाव्यतिरिक्त तेजश्री काय करतेय, हे जाणून घेण्यास नक्कीच तिचे चाहते उत्सुक असणार आहेत. तेजश्रीलासुद्धा आपल्या चाहत्यांच्या या उत्सुकतेविषयी ठाऊक आहे. म्हणूनच तिने आपल्या नवीन प्रोजेक्टविषयीचे मौन तोडले आहे.
तेजश्रीने आता आपला मोर्चा वळवला तो हिंदीकडे. मात्र एखाद्या हिंदी मालिकेत किंवा सिनेमात ती झळकणार नाहीये. तर 'मैं और तू' या हिंदी नाटकात तेजश्री काम करताना दिसणारेय. विशेष म्हणजे या नाटकात ती बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशीसोबत झळकणारेय. तेजश्रीने आपल्या या हिंदी नाटकाचे पहिले पोस्टर ट्विट करुन कमिंग सून असे लिहिले होते. तर आज तिने नाटकाच्या शीर्षकासह हे नाटक हिंदी असून यामध्ये ती शर्मन जोशीसोबत काम करत असल्याचे जाहिर केले आहे. ट्विटरवर तेजश्रीने शर्मन जोशीची पोस्ट रिट्विट केली असून ''Yessss it's a PLAY #MainAurTum. keep loving n keep blessing'', हे लिहिले आहे.
या हिंदी नाटकाची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः शर्मन जोशीने केले आहे. हे एक रोमँटिक कॉमेडी नाटक असून 'सम टाइम नेक्स इयर' या इंग्रजील नाटकावर आधारित आहे. या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
विशेष म्हणजे तेजश्रीने अलीकडेच तिचा न्यू हेअर कटमधील एक फोटो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला होता. तिचा हा नवीन कदाचित या नाटकासाठीच असावा, असा अंदाज आहे.तेजश्रीने मराठी मालिका आणि रंगभूमीसोबतच झेंडा, शर्यत, लग्न पहावे करुन, डॉ. प्रकाश बाबा आमटे या मराठी सिनेमांमधूनही आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, तेजश्रीने नाटकाविषयी केलेले ट्विट आणि सोबतच तिचा नवीन लूक...
बातम्या आणखी आहेत...