आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: वैभव जोशींची 'तेव्हाची कविता कोरी'' सागरिकाने केली पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी तसेच बंगाली म्युझिक क्षेत्रात आघाडीचे नाव असलेल्या सागरिका म्युझिकने आजवर अनेक गायकांना उत्तम संधी देऊन त्यांचे करिअर घडविण्यात मोलाची साथ दिली आहे. सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न सागरिका म्युझिक करत असते आणि त्यांच्या या अथक प्रयत्नांना उत्तम यशही प्राप्त झाले आहे.
नेहमीच काही तरी वेगळे करण्यात व्यग्र असलेल्या सागरिकाचे लक्ष गेले ते प्रियंका बर्वे या नव्या गायिकेकडे. 'प्रेमाला' या हिट गाण्यानंतर सागरिकाने प्रियांका बर्वेसाठी आणखी एक गाणं करायच ठरवल. वैभव जोशींनी लिहिलेलं 'तुझ्यासवे तुझ्याविना' हे गाण करायचं शेवटी ठरवलं. यावेळी मात्र सागरिकाला संगीतकार ही नवीन हवे होते. तेव्हा प्रियांकाने तिच्या ग्रुपमधील जसराज जोशी, हृषिकेश दातार आणि सौरभ भालेराव यांच नाव सुचविलं. त्यांनी याआधी रेकॉर्ड केलेलं 'तेव्हाची कविता कोरी' हे गाणं प्रियांकाने सागरिकाला ऐकायला दिलं. सागरिकाला हे गाणं इतकं आवडलं की तिने प्रियंकाच्या नव्या गाण्यासाठी या बॅण्डला निश्चित तर केल आणि सागरिका म्युझिकच्या १६ व्या Anniversary कॉन्सर्टमध्ये हे गाणं पुन्हा नव्याने रिलीज करण्याचे ठरविले. सागरिकाने तर या बॅण्डला त्यांच्या आद्याक्षरावरून JSH असे नावही दिले.
या गाण्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं जसराज जोशी, सौरभ भालेराव आणि ऋषिकेश दातार ह्या तिघांवर चित्रित करण्यात आले आहे. एका जमता-जमता राहून गेलेल्या या कवितेचे शब्द वैभव जोशी यांनी लिहिले असून या व्हिडिओची संकल्पना आणि दिग्दर्शन सागरिका दास यांचे आहे. सध्या सोशल नेट्वर्किंग साईट्सवर 'तेव्हाची कविता कोरी…' या गाण्याच्या व्हिडिओला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.