छोट्या दोस्तांसाठी डिस्नेच्या जादुई दुनियेची सफर घरबसल्या करता आली तर.. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या असून बच्चेकंपनीच्या आवडी-निवडी जपत झी टॉकीजने ही आगळी-वेगळी संकल्पना राबवली आहे. सर्वच वर्गातील प्रेक्षकांचा जाणीवपूर्वक विचार करणारी झी टॉकीज वाहिनी अॅनिमेशनजगतातल्या काही निवडक लोकप्रिय चित्रपटांचा खजिना मराठीत घेऊन आली आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटातल्या गाजलेल्या कॅरेक्टरसाठी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंतांनी आवाज दिला आहे. डिस्ने चित्रपट महोत्सवाच्या प्रारंभी ३ मे ला या डिस्नेकुटुंबातला‘द लायन किंग’ हा धमाल सिनेमा सर्वांच्या मनोरंजनासाठी येणार आहे.
सिंबा, नाला, टिमॉन, पुंबा अशा धमाल दोस्तांची ही गोष्ट आहे. अफ्रीकेतील जंगलावर राज्य करणारा 'लायन किंग' मुफासा.त्याच्याकडे नव्या युवराजाच्या रुपाने 'सिंबा' चा जन्म होतो. 'सिंबा'ला जंगलातल्या बर्या - वाईट सर्व गोष्टींची ओळख करुन देणे हे मुफासाचे रोजचे काम. सिंबा भविष्यातला राजा आहे ह्या दृष्टीने मुफासा त्याला तयार करत असतो सिंबाच्या जन्मामुळे मुफासाच्या नंतर सिंहासनाचा वारस होउ शकणारा सिंबाचा काका स्कार हताश होउन जातो,सिंहासनाची स्वप्ने पाहत स्कार सतत वेगवेगळे कट रचत असतो. स्कारच्या कटकारस्थानामुळे मुफासाला
आपला जीव गमवावा लागतो. वडिलांच्या मृत्युमुळे कोवळ्या सिंबाच्या डोक्यावर आकाशच कोसळते. 'हाकुना मताता’मीन्स 'नो वरीज' असे जीवनाचे तत्वज्ञान टिमॉन आणी पुंबा सिंबाला शिकवतात. आयुष्यात मागे काय घडलेते विसरायला लावून त्याला नवीन आयुष्य जगायला शिकवतात.बाप व मुलाचं अतूट नातं अन् छोट्या जगण्याला मोठा अर्थ प्राप्त करून देणारा हा चित्रपट भावनास्पर्शी आहे.
सिम्बाच्या काका’च्या भूमिकेतील स्कारला ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी आवाज दिला आहे. तर आदिनाथ कोठारे या अभिनेत्याने सिम्बाचे कॅरेक्टर आपल्या आवाजाद्वारे उत्तमरित्या वठवलय. शिवाय ‘द लायन किंग’ या सिनेमाचे गाणे सुप्रसिद्ध गायिका अपेक्षा दांडेकर यांनी गायलं आहे.
‘द लायन किंग’हा चित्रपट रविवारी ३ मे ला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता पाहता येईल.झी टॉकीजने पेश केलेलाडिस्ने विश्वाचा अनोखानजराणाकुटुंबातल्या प्रत्येकासाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.मराठी भाषेत डब केलेल्या डिस्नेच्याया धमाल चित्रपटांचा आस्वाद दर रविवारी घेता येणार आहे. ३ मे ते ३१ मे दरम्यान डिस्नेचे हे धमाल चित्रपट प्रक्षेपित केले जाणार आहेत.