आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे मिळते मृतदेहांसोबत रात्र घालवण्याची संधी, आतापर्यंत आले आहेत 4 कोटी लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही कधी मृतदेहासोबत जमीनीमधील एक रात्र घालवली आहे का? असा विचारदेखील केला नसेल...परंतु पॅरिसमध्ये एक संस्था दोन लोकांना अशी संधी देत आहे.
पॅरिस- सणासुदीला अनेक कंपन्या विविध ऑफर्स ग्राहकांना देतात. यावेळी देश-विदेशात हॅलोवीनची क्रेझ वाढत चालली आहे. एअरबीएनबी नावाच्या एका वेबसाइटने लोकांना विचित्र ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये इच्छुक लोकांनी 60 लाख मृतदेहांसोबत एक रात्र घालवायची संधी मिळणार आहे. पॅरिसमध्ये जमीनीपासून 20 मीटर खोल डिझाइन केलेले ठिकाण 'कब्रो का तहखाना' नावाने प्रसिध्द आहे.
हे तळघर मृत लोकांची हाडे आणि कवट्याच्या दोन-दोन किलोमीटर लांब भिंती बनलेल्या आहेत. संस्थेनुसार या ठिकाणाच्या खासगी भागाचा अधिकार मिळवण्यासाठी 3.5 लाख यूरो (जवळपास 2.5 कोटी रुपये) इतकी रक्कम भरली आहे. ऑफरमध्ये येथे दोन व्यक्तींनी एक रात्र घालवण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामध्ये एक बेडरुम आणि पलंग दिला जाईल. सोबत, नाश्ता, रात्रीचे जेवण आणि एक म्यूझिकल कन्सर्टची सुविधा दिली जाणार आहे.
4 कोटींपेक्षा जास्त लोकांना पाहिले हे मृतदेहांचे तळघर-
संस्थने यापूर्वीसुध्दा अशा ऑफर्स दिल्या आहेत. हे तळघर 2008मध्ये सुरु करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 4 कोटींपेक्षा जास्त लोक येथे आलेले आहेत. एअरबीएनबीनुसार, या ठिकाणाचा वापर काही हॉलिवूड सिनेमे आणि फॅशन शोसाठीसुध्दा केला जातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या मृतदेहांच्या तळघराचे काही फोटो...