Home | Bollywood | Marathi Cinekatta | The reason why Actress Suruchi Adarkar fight with Ganpati Bappa

Celebrity Ganesha: जय-आदितीची परिक्षा घेणा-या बाप्पावर का चिडली होती सुरूची? जाणून घ्या

अनुजा कर्णिक | Update - Sep 22, 2015, 04:36 AM IST

सध्या ‘का रे दूरावा’ मालिकेतल्या आदितीवर बाप्पाचाच धावा करण्याची वेळ आली आहे. तिची गूपितं सगळ्यांसमोर रजनीने फोडल्यावर आता ती चांगलीच पेचात पडली आहे.सध्या ‘का रे दूरावा’ मालिकेतल्या आदितीवर बाप्पाचाच धावा करण्याची वेळ आली आहे. तिची गूपितं सगळ्यांसमोर रजनीने फोडल्यावर आता ती चांगलीच पेचात पडली आहे.

 • The reason why Actress Suruchi Adarkar fight with Ganpati Bappa
  सध्या ‘का रे दूरावा’ मालिकेतल्या आदितीवर बाप्पाचाच धावा करण्याची वेळ आली आहे. तिची गूपितं सगळ्यांसमोर रजनीने फोडल्यावर आता ती चांगलीच पेचात पडली आहे. आता तिच्या मदतीला देव धावून येईल, अशी सध्या आदिती-जयचे फॅन्स अपेक्षा करत आहेत. आदिती-जयला सगळ्यांच्यासमोर नवरा बायको म्हणून कधी निर्धास्तपणे येता येईल, ते काही कोणालाच सध्या माहित नाहीये. पण आता त्यांच्या आयुष्यातले विघ्न दूर व्हावे म्हणून सध्या अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सुरूची आदारकर तरी प्रार्थना करत आहेत.
  सेटवर बाप्पाचे आगमन तर गणेशोत्सवाच्या शुटिंगच्या निमीत्ताने झालेच आहे. आणि त्याच निमीत्ताने ऑफस्क्रिन सुरूची आदारकर आणि सुयश टिळक जरा बाप्पाभक्तीमध्ये रमलेले दिसले.
  सुयशला मालिकेच्या ट्रॅकविषयी विचारल्यावर तो म्हणतो, “ आपल्या ऑफिसमध्ये आपल्याबद्दल कोणाला कळू नये म्हणून जय-आदितीने सतत आतोनात प्रयत्न केलेत. पण गणेशोत्सावाच्या काळातच ह्या दोघांसमोर आता एक मोठं विघ्न उभं ठाकलंय. पण आदिती-जय दोघंही आयुष्यात एकमेकांना साथ द्यायला नेहमी तयार असतात. आता इथेही दोघे एकमेकांना साथ देताना दिसतील. खरं तर, ही त्यांच्या आयुष्यातली फार महत्वाची कसोटीच म्हणायला हवी.”
  आदितीची अवस्था तर सध्या देव तिची परिक्षा पाहत असल्याप्रमाणे झालीय. पण ख-या आयुष्यात तिनेच एकदा बाप्पाला प्रश्न विचारला होता. बाप्पाने आपल्या दिव्यत्वाची प्रचिती तिला कशी दिलीय, ते सुरूची ह्यानिमीत्ताने Divyamarathi.comला सांगू लागली.
  ती म्हणते, “ लहानपणापासूनच बाप्पा माझा लाडका. त्यामुळे आपल्या घरी गणपती यावा, अशी सुप्त इच्छा होती. पण ती कधी पूर्ण होऊ शकली नाही. आजोळी वेंगुर्ल्याला गणपती येतो. पण तिथे जाणे शक्य होत नाही. अशावेळी मी माझी बेस्ट फ्रेंड स्नेहाच्या घरी मी जाते. शिवाय मी ठाण्यात राममारूतीरोडवर अनेक गणेशमंडळ आहेत. तिथे दर्शन घेते. गणपतीचे दहाही दिवस तुम्ही कोणत्याही गणेशमंडळात दर्शनाला जाऊ शकता. त्यामूळे जिथे पाय वळतील. तिथे जाऊन त्याचं मनोहारी रूप अनुभवते. आणि मनात साठवते.”
  पुढील स्लाइडमध्ये, एवढी नितांत भक्ती असलेल्या बाप्पावर सुरूची का चिडली जाणून घ्या

 • The reason why Actress Suruchi Adarkar fight with Ganpati Bappa
   
  बाप्पावर नितांत भक्ती असलेली सुरूची आपल्या आणि गणपती बाप्पाच्या भांडणाबाबत सांगते, “मी दहाही दिवस बाप्पाचे दर्शन घेत असल्याने एकदा विसर्जनाच्या दिवशी एका मिरवणूकीत दर्शनासाठी जातं होते. पण त्या बाप्पाच्यामिरवणूकीत एवढी गर्दी होती, की अक्षरश: चेंगरा चेंगरी होत होती. त्यामूळे एक पाऊलही त्याच्या दिशेने टाकणे अशक्य झाले. त्यादिवशी त्याचे नीट दर्शन झाले नाही. आणि मग मी हिरमुसले. त्याच्यावर चिडले. आणि त्याला मनातच सांगितलं, की तुझ्या भक्तांना तुझे व्यवस्थित दर्शन देण्याची तुझी जबाबदारी आहे. जर मला ह्यापूढे तू व्यवस्थित दर्शन देणार नसशील, तर तूझ्या दर्शनाला मी कधीच येणार नाही.”
   
  सुरूची पूढे सांगते, “बाप्पाने पुढच्याचवर्षी त्याचा करिश्मा दाखवला. मला माझी पहिली मालिका मिळाली. ओळख मालिकेने मी सेलिब्रिटी झाले. लोकं मला ओळखू लागली. आणि त्यावर्षीच्या गणेशोत्सवात एका गणेशमंडळाचं दर्शनासाठी आमंत्रण झालं. मला असं वाटतं, हे त्यानेच घडवून आणलं. बाप्पानेच माझ्या मनात त्याच्याविषयी असलेला राग दूर केला. त्याची दिव्य प्रचिती मला ह्या अनुभवाने आली. आणि मग मी त्याच्याशी अजूनच कनेक्ट झाले. आपण जे मनापासून मागतो. ते तो ऐकतो, हे पटलं.”  
   
  पुढील स्लाइडमध्ये पाहा, जय-आदितीची गणेशपूजा 
 • The reason why Actress Suruchi Adarkar fight with Ganpati Bappa
  जय- आदितीसोबत देव ट्रॅव्हल्सचा ऑफिस स्टाफ  
 • The reason why Actress Suruchi Adarkar fight with Ganpati Bappa
  जय-आदितीची गणेशपूजा 
 • The reason why Actress Suruchi Adarkar fight with Ganpati Bappa
  आदिती मागतेय, बाप्पाकडे आशिर्वाद 
 • The reason why Actress Suruchi Adarkar fight with Ganpati Bappa
  विघ्नहर्ता करेल का जय-आदितीच्या आयुष्यातली विघ्न दूर? 
 • The reason why Actress Suruchi Adarkar fight with Ganpati Bappa
  सुरूची आदारकर काढतेय बाप्पासोबत सेल्फी 

Trending